Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पांचवें कांड.

१६९

करण्याकरितां निघून गेल्या, आणि कांहींजणी तिच्या रक्षणाकरितां तेथेंच राहिल्या.
 त्यानंतर सीतादेवी अत्यंत शोकाकुल होऊन रडूं लागली. ती त्या झाडाच्या एका पुष्पित शाखेला धरून उभी राहिली, आणि आपल्या मनाशी आपल्या दुर्दैवाचें चिंतन करूं लागली. ती मोठ्या 'दुःखाने स्वतःशी म्हणाली. 'हाय रे देवा, आतां माझ्या आयुष्यां- तील फक्त दोनच महिने वाकी राहिले आहेत. दोन महिन्यानंतर हा मेला दुष्ट रावण मला खात्रीने ठार मारील. हा पापी मला नाना तऱ्हेची भीति दाखवितो, नाहीं नाहीं तीं दर्भाषणे बोलतो. माझें जीवन आतां दिवसेंदिवस अत्यंत कष्टमय होत चालले आहे. काय, आतांपर्यंत कौसल्यानंदनाला माझा शोध लागला नसावा ! बरें, शोध लागून त्यांनीं मला आपल्या हृदयराज्यांतून काढून तर दिलें नसेल ना! आतां सुटकेची मला मुळींच आशा करायला नको. मी महाबली पुरुषाची धर्मपत्नी असून इतके क्लेश सोसावे ना ! इतके हाल सोसून मी फक्त स्वामींच्या दर्शनाच्याच इच्छेनें, आणि आशे- नेच या वेळपर्यंत जिवंत राहिल आहे. पण तीहि आशा आतां दूर राहिली; मला वाटतें माझें मरण जवळ आलें आहे, तेव्हां आतां जगण्यांत तरी काय अर्थ आहे. मला प्राणाधार मिळण्याचीच जर आशा नाहीं, तर जगून लाभ कोणता ? अमूल्य सतित्वरत्न नष्ट होण्यापेक्षां मृत्यूच शंभरपटीने जास्त चागला. या राक्षसाच्या हातून मरण्यापेक्षां आत्महत्त्या करून मरणें चांगलें आहें. जरी आत्महत्त्या करून मरणें हें पाप आहे, तरी सतीत्व नष्ट होण्या- पेक्षां तेच जास्त श्रेयस्कर होय. एवढ्याचकरितां मी आत्महत्त्या करीन. त्याचे मला मुळींच दुःख वाटत नाहीं. मृत्यूच्या वेळी देखील माझ्या स्वामींच्या चरणयुगलाचें मला दर्शन होत नाहीं, एवढेच मला अत्यंत दुःख वाटत आहे. हर हर ! नाथ, आपण कोठें आहांत.