Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पांचवें कांड.

१६५

स्पर्शसुद्धां केला नाहीं. हे देवी, तूं विश्वास ठेव, मी तुला केव्हांहि फसवणार नाहीं. तूं मला भिऊं नकोस. कधींतरी घातलेली श्रेणीं, जमिनीवर शयन, उपवास आणि मलीनवस्त्रधारण, या गोष्टी तुला योग्य आहेत काय ! इकडे एकदां लक्ष तर दे. पहा तर खरें! मी पाहतों कीं तूं रात्रंदिवस रामचंद्राचे ध्यान करण्यांत व चिंतन करण्यांत मग्न राहतेस. त्याच्यासंबंधाने काळजी करण्याचे तुला आतां सोडून दिलें पाहिजे. आतां तूं रामापासून आपले मन पर- तवून तें मजकडे लाव. माझेंच स्मरण व मनन करीत जा. तूं आपले अज्ञान आतां सोडून दे. माझ्या अंतःपुरात एक नन्हे, दोन नव्हे तर हजारों रूपवती स्त्रिया आहेत; त्या सर्वांची तूं मुख्य हो. ही माझी गोष्ट ऐक. मी आतांपर्यंत जेवढा रत्नमंचय केला आहे, तेवढा सर्व तुला अर्पण करतों. तूं माझी भार्या हो. तूं आनं- दाने माझा स्वीकार कर. मी तुझ्या प्रसन्नतेकरितां माझे सर्व राज्य तुझ्या पित्याला अर्पण करतो. माझी बरोबरी करूं शकेल, असा जगांत एकहि मायेचा पूत नाहीं. हे देवी, ज्या रामाचें तूं ध्यान, करतेस, ज्याच्याकरितां तूं आपले शरीर इतकें कृश करून घेतले. आहेस, व ज्याच्या वियोगामुळे तूं सर्व सांसारिक सुखोपभोग सोडले आहेस, तो धनाने, ऐश्वर्यानें, बलानें, आणि प्रतिष्ठेने माझी बरो बरी केन्हांही करूं शकणार नाहीं. या करितां तूं माझी वामांगी तूं होऊन या धनरत्नपरिपूर्ण लंकेची अधीश्वरी हो. '
 दुरात्म्या रावणाची अशी संतापजनक आणि दुःखदायक पापी वाणी ऐकून सीता देवी उच्च स्वराने रडूं लागली. नंतर क्षणभ राने ती आपले मनोविकार शांत करून त्याला म्हणाली, ' हे राक्षसराजा, तूं माझी इच्छा करूं नकोस. तूं आपल्या स्त्रीवरच अनुरक्त रहा. जसा पापी मनुष्य मुक्तीला वश करूं शकत नहीं: तसा तूं मला केव्हांहि मिळवू शकणार नाहींस.' इतकें बोलतां