हीच योग्य आहे, असें हनुमानास वाटलें. रामचंद्र जर हिच्यावि-षयी इतका अनुराग दाखवितात, तर ही पण आपल्या स्वामीविषयी . तितकीच भक्तिमती असणें हेंच योग्य आहे, असेंच असले पाहिजे. सम. नगुणशील दांपत्यामध्ये असा अनुराग असलाच पाहिजे.
सितेची अशी शोचनीय स्थिति पाहून हनुमानाचे दयाळू हृदय दयायुक्त झाले त्याच्या नेत्रांतून वाप्पधारा वाहू लागल्या. महा- वीर हनुमान सर्व रानभर त्या वृक्षावरच होता. तेथें बसला असतां सीतेशी काय बोलावे, कसे बोलावे या विचारांतच ती सर्व रात्र निघून गेली. जेव्हां पहाट झाली, तेव्हां त्याच्या कानीं स्त्रियांचे नूपुरध्वनि येऊ लागले. थोड्याच वेळांत तो आवाज जवळ आप- स्याजवळच होत आहे असें त्याला वाटलें. इतक्यांत रावणराज अनेक रूपवती स्त्रियांनी वेष्टिलेला सीतेच्या दर्शनाकरितां येत आहे असें त्यानें पाहिलें. पापी रावणाला दुरूनच पाहून सीतेचें हृदय भीतीनं कांं लागले. ती तें तसेच हाताने दाबून आणि गुडन्यांत · खाली मान घालून स्वस्थ बसली. तिच्या नेत्रांतून अश्रुप्रवाह चालले होते. त्या दिवशी सीतेच्या मनांत रावणाच्या मृत्यूविषयी कल्पना उद्भवली होती. तो जसजसा जवळ येऊ लागला, तस- तशी ती मोठ्यानें आक्रोश करूं लागली. रावण जवळ येतांच तिचे डोळे रागाने लाल झाले. बिचारी असहायाप्रमाणें चहूंकडे पाहू लागली. पण कोणीच सहायक तिच्या दृष्टीस पडेना.
सतिच्या जवळ येताच रावणानें तिला अनेक प्रलोभनाची आशा दाखविली. बन्याच बढाया मारल्या, आणि गोड गोड शब्दांनी तिचे शांतवन करण्याचा प्रयत्न केला. तो सीतेला म्हणाला, 'हे जानकी, तूं मला पाहून इतका संकोच कां करतेस? मी तुझ्याजवळ प्रणयाची भिक्षा मागत आहे; म्हणून तुला माझा सन्मान केला पाहिजे. तुझी इच्छा नाहीं असें पाहून मी तुझ्या शरीराला अद्याप
पान:सीताचरित्र.pdf/१९३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४
सीताचरित्र.