१६१
भ्रात्याच्या शोनें लक्ष्मणही जिवंत राहणार नाहीं. हाय, माझे प्राणेश्वर जर जिवंत नसतील तर मी मग जगून तरी काय फायदा ! त्या पतिदेवाशिवाय मला सर्व जग शून्य दिसते. माझे हृदयहि फार कठोर आहे. कारण तें अजून त्यांच्या विर- हानें दुभंग होत नाहीं. मीं पूर्वजन्मीं कांहीं तरी मोठें पाप केलें आहे खास ! त्याचेच हे वाईट फळ मला आतां भोगावें लागत आहे. कौसल्यानंदनाला माझी अजून आठवण झाली नसेल काय ! किंवा माझ्या दुरावस्थेची त्यांना अद्याप वार्ता समजली नाहीं ! माझे स्वामी महावीर आहेत. त्यांना माझा पत्ता लागतांच ते शत्रूचा समूळ नाश करून टाकतील. मी राजर्षि जनकाची कन्या असून महाराजा दशरथाची सून आणि धर्मधुरंधराची धर्मपत्नि आहे. हाय, माझ्या भाग्यांत दुःखच भोगण्याचें लिहिलें आहे काय ? मी जागी आहे किंवा निजलें आहें, कां मी स्वप्नांत आहे ?या वेळेल मी कुठे आहे ? माझे स्वामी माझ्यापासून किती दूर असतील. मला येथें कोण घेऊन आलें. रावणाने मला अजून माझ्या पतीजवळ कां नाहीं पोहचविलें ? देवा, मीं रावणाचा असा काय अपराध केला होता, की त्याने आमची उभयतांची ताटातूट केली. आतां माझ्या जगण्यांत कांहीं अर्थ नाहीं. हाय, हाय, या वेळी मृत्यु येईल तर रें होईल ! तोहि जर येणार नाहीं तर मला आत्महत्याच करावी लागेल. आत्महत्या करणें मोठें पाप समजतात. तें कितीहि मोठे असले तरी सतित्व नष्ट होण्यापेक्षां प्राण नष्ट झाले तर तें मला प्रिय आहे. येथे तर आत्महत्या करण्याला साधनहि नाहीं. या दुष्ट राक्षसी नेहमी माझ्यावर लक्ष ठेवीत असतात. मला मरण्याला देखील सवड नाहीं. हायरे देवा, माझ्यासारखी हतभागिनी कोणी नसेल. हा विधात्या, तूं हें काय करीत आहेस ! '
एक वेळा नव्हे, दोन वेळां नव्हे, अनेक वेळां सीतेनें अशा