Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चौथें कांड

१४३

सुग्रीवाचे मित्र होते, याचा त्याने विचार करावयास पाहिजे होता. मित्राला सहाय्य करणें हा मित्राचा परम धर्म आहे. दुसरे त्यांनी सुग्रीवाजवळ वालीच्या वधाविषयीं प्रतिज्ञा केली होती. रामचंद्र सत्यप्रतिज्ञ होते. आपल्या प्रतिज्ञेचे पालन करणें हाच त्यांचा मुख्य धर्म होता. तिसरे कारण, वालीनें आपल्या धाकट्या भावाची धर्मपत्नी बलात्काराने घेतली होती. कन्येप्रमाणें असले- ली बंधूची स्त्री वश करून ठेवणें हें पाप नव्हे का ? यांकरितां अशा पापी वालीला मारण्यांत रामचंद्रांनी अन्याय केला नाहीं. तर त्यांनी हें धर्माचें व न्यायाचेंच काम केलें. यावद्दल विचार- शील माणसें रामचंद्राला दोषी अथवा अधर्मी म्हणूं शकणार नाहींत.
 वालीच्या मृत्यूचे दुःखदायक वर्तमान अल्पावकाशांतच साया किष्किभर पसरले. ही भयंकर वार्ता ऐकतांच तारेच्या आंगाला विजेप्रमाणे झटका बसला. ती रडत रडतच वालीचें शेवटचें दर्शन घेण्याकरितां रणभूमीकडे चालली. तिच्या बरोबर तिच्या दासीहि चालल्या. सर्व शहरांत एकच हाहा:कार माजला. रणक्षेत्रांतून वीरशय्यवर वालीला निजलेला पाहून तारा मोठ्यानें विलाप करूं लागली. त्या वेळचा तिचा दारुण विलाप ऐकून पाषाण हृदयहि द्रवले असतें. तिचा शोक पाहून सुग्रीव अधीर झाला. युवराज- अंगद आपल्या पित्याची दशा पाहून आक्रोश करूं लागला. तेथें जितकीं मनुष्ये त्या वेळीं होतीं, त्या सर्वांत रामचंद्र आणि लक्ष्मण हे जास्त धैर्यवान होते. परंतु त्यांचेहि चित्त तारेचें दुःख पाहून विरघळल्याशिवाय राहिलें नाहीं. वाली कंठींप्राण धारण करून पडला होता. त्यानें तशाच स्थितींत सुग्रीवाला जवळ हाक मारली. नंतर तो त्याला दुःखानें म्हणाला, सुग्रीवा, मी आपल्या दुर्भा- ग्याने अथवा पाप कर्माच्या फलानें अशा अवस्थेला येऊन पोह- चलों. मी आपल्याच हाताने आपल्या पायावर कुल्हाड मारून