Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
सीताचरित्र.

धनुष्यवाण घेऊन झाडाच्या आड उभे होते. ' युद्ध करता करतां सुग्रीव अगदीं थकून गेला आहे, तो आतां पुनः पळण्याच्या वेत आहे,' असे जेव्हां रामचंद्रांनी पाहिले तेव्हां त्यानी एक भुजंग- भूपणवाण काढून धनुष्याला लावला, आणि आकर्ण त्याची दोरी ओन वालीवर नेम धरून तो तत्काल सोडला. तो वाण सं सूं करीत जो आला तो वालीच्या शरिरांत शिरला. तो मर्मस्थानीं बस- तांच वीर वाली वृक्षाप्रमाणे धाडकन् जमिनीवर कोसळून पडला. त्याला प्राणांतिक वेदना होऊं लागल्या. तो मोठ्या कष्टानें श्वासोश्वास घेऊं लागला. ' रामचंद्र मोठे धार्मिक व शूर वीर आहेत, ' म्हणून जो त्याचा या वेळपर्यंत दृढ विश्वास होता तो आतां पार नाहींसा झाला. रामचंद्राच्या हातून असले कापुरुपतेचे काम होईल, व ते करतील, असें वालीच्या स्वप्त सुद्धां नव्हतें. तो कण्हत कण्हत म्हणाला “रामचंद्रांनी माझ्या समोर न येतां मला जो आडून वाण मारला, त्याबद्दल सर्व जग त्यांची निंदाच करील. मी त्यांचा आतां - पर्यंत अजाणतां एकहि अपराध केला नाहीं. तर मग अकराण - षाला वश होऊन त्यांनी मला का मारलें ? अकारण द्वेषभाव ठेवण हे पाप नव्हे काय ? ते धर्मज्ञ नसून पापी आहेत; अशी माझी. आतां खात्री झाली. ते उच्छृंखल व चंचल आहेत; म्हणूनच राज्य कारभाराला अयोग्य समजून कैकयीनें त्यांना वनवासाला पाठवून दिले हें योग्यच केलें. जर रामचंद्राला त्यांच्या सीतेचा पत्ताच पाहिजे होता तर त्यांनी मला कां नाहीं सांगितले? त्याच वेळेस मीं पापी • रावणाला ठार मारून सीतेला सहज आणून त्यांच्या स्वाधीन केली असती. असल्या क्षुल्लक कामाकरितां त्यांनी हें एवढे मोठे पाप कां केलें? "
 यांप्रमाणे भूमीवर जखमी होऊन पडल्या पडल्या वालीने रामाची मनसोक्त निंदा केली. परंतु तें सर्व खोटें. पहिल्याने रामचंद्र हे