Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चौथें कांड.

१४१

त्याला म्हणाली ' स्वामी, आज आपल्याला युद्धाला जातांना पाहून माझें हृदय धडधड करते. आज आपण युद्धभूमीवर जाऊं नये. काल किंवा परवां सुग्रीव आपल्या हातून पराजित होऊन पळाला असतां, पुनः आज मुद्दाम आपणाला बोलावीत आहे, तेव्हां यांत कांही तरी कपट आहे, खास. अवश्य यांत कांहीं तरी गुप्त भेद आहे. खरोखर यांत गुप्त भेद आहेच. दोन चार दिवसांपूर्वी युवराज अंगद मला येऊन म्हणाला. 'आई, मी आज मुख्य हेराच्या तोंडून असे ऐकिलें आहे की; राम, लक्ष्मण, या नांवांचे दोन राजकुमार ऋष्यमूक पर्वतावर सुग्रीवा जवळ येऊन राहिले असून त्यांच्यावरी.. वर त्याची मैत्रीहि झाली आहे. मी आणखी हैंहि ऐकिलें आहे कीं, ते दोघे मोठे पराक्रमी वीर आहेत. ' या गोष्टीची मला आतां आठवण झाली. सुग्रीव इतक्या लवकर ज्या अर्थी पुनः युद्धाला आला, त्या अर्थी हेच माझें अनुमान खरे आहे. त्याला रामचंद्राकडून सहाय्य कर- ण्याबद्दल वचन मिळाळे असेल. हाच त्यांतील मुख्य अर्थ दिसतो. असें जर नसतें तर सुग्रीव दुसऱ्या कोणाच्या बलावर दुसऱ्यांदा आपल्या बरोबर युद्ध करावयास येता ? माझें अनुमान जर खरें असेल, म्हणजे रामचंद्र जर त्याला सहाय्य करणार असतील तर ते आपल्या कल्याणाचें खास नव्हे, असें मला खात्रीपूर्वक वाटतें.
 याप्रमाणे तारेनें वालीची पुष्कळ समजूत केली. वाली मोठा तेजस्वी पुरुष होता; तो म्हणाला, ' रामचंद्र धर्मज्ञ, व कर्तव्यपरा- यण आहेत. ते असलें घोर पाप केव्हांहि करणार नाहींत, हें मला ठाऊक आहे.
 याप्रमाणें तारेची समजून करून वीर वाली युद्धभूमीवर येऊन सुग्रिवाशी घोर युद्ध करूं लागला. वाली मोठा बलवान होता.. त्याचे प्रहार मोठे कठीण होते. त्याच्या मुष्टिप्रहारांनी सुग्रीवाचें अंग अगदी खिळखिळे होऊन गेलें. याही वेळेस रामचंद्र हातांत