Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०
सीताचरित्र.

कांहीं वेळ जर सुग्रीवानें वालीशी युद्ध केलें असतें, तर तो वाली- च्या हातून मारलाच गेला असता.
 सुग्रीव येऊन बसला, इतक्यांत राम, लक्ष्मण, व हनुमान ही मंडळी येऊन पोहचली. त्यांना पाहून सुग्रीवानें लज्जेने खाली मान घातली. कांहीं वेळाने रागाने बेफाम होऊन तो रामचंद्राला कठोर वचनें बोलू लागला. रामचंद्र फार शांत व विचारी होते. त्यांनी त्यावेळच्या त्याच्या कठोर भाषणाचे दुःख मानले नाही. उलट ते त्याची समजूत करूं लागले. ते म्हणाले 'मित्रा' रागावूं नको. मी आज कोणत्या कारणानें वाण सोडला नाहीं, तें ऐक. जेव्हां तुम्हीं दोघे युद्ध करीत होता, तेव्हां दुरून मी तुम्हां दोघांना नीट ओळखू शकलों नाहीं. एवढ्याचमुळे मी प्राणांतक बाण सोडला नाहीं. मला वाटलें कीं, चुकून मित्र- घात मात्र न व्हावा. मी खरोखर सांगतों, आणि तूंहि खात्री ठेव कीं तुझ्याशिवाय या वेळेस आमचा दुसरा कोणी सहाय्यक नाहीं. या वेळी मी, जानकी, आणि लक्ष्मण तुझ्याच आधीन आहोत. पुनः जाऊन तूं वालीबरोबर युद्ध कर. यावेळीं माझ्या एकाच बाणानें वालीचा वध होतो कीं नाहीं हें तुझ्या दृष्टीस पडेल. इतकें बोलून युद्धाच्या वेळी सुग्रीव ओळखूं यावा म्हणून त्यांनी त्याच्या गळ्यांत नागपुष्पलता बांधिली.
 रामचंद्राच्या आज्ञेनें ते सर्वजण लगेच किष्किवेला जाऊन पोहचले. मुख्य दरवाजाजवळ जाताच सुग्रीवानें पुनः वालीला युद्धाला बोलाविले. सुग्रिवाची ती गर्जना ऐकून महाबली वालीचे नेत्र क्रोधानें अशीप्रमाणें लाल झाले. तो रागानें तसाच उठून युद्धाकरितां बाहेर आला. तो बाहेर युद्धाला निवाला, इतक्यांत त्याची तारा नांवाची स्त्री त्याच्यापुढे मार्गांत आडवी येऊन उभी राहिली. तारा मोठी पतिप्रणयिनी व बुद्धिमती होती. रस्ता अडविण्याचें कारण वाली जेव्हां तिला विचारूं लागला, तेव्हां बुद्धिमती तारा