Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चौथे कांड.

१३५

असें ठरलें. हनुमान मोठा विद्वान, धार्मिक, बुद्धिमान, आणि स्वामिभक्त होता. राजाची आज्ञा शिरसावंद्य करून तो रामचं- द्राकडे गेला. हनुमान राजनीतिज्ञ असल्यानें राजनीतीचे डाव - पेंच त्याला पूर्णपणे अवगत होते. तो आपल्या खऱ्या वेषानें राम- चंद्राकडे न जातां भिक्षुक ब्राह्मणाच्या वेषानें गेला. त्याच्या मनां- तून त्यांच्या मनाचा प्रथम भेद व्यावयाचा होता.
 दोघां बंधूंजवळ जाऊन त्याने प्रथम त्यांचा परिचय करून घे तला, आणि नंतर आपली हकीकत सांगून तो त्यांना म्हणाला, 'महाराज, सुग्रीव वानरराज आपल्याशी मैत्री करूं इच्छितात, ' हनुमानाच्या तोंडचे हे शब्द ऐकून त्यांना फार आनंद झाला. ते मनांत म्हणाले ' ज्याला आम्ही शोधतो आहोत, ज्याच्याशी आ. मची मैत्री व्हावी असें आम्हांला वाटत आहे, तो स्वतःच आम- च्याशी मैत्री करण्याची इच्छा करतो यापेक्षां आणखी चांगली गोष्ट ती कोणती घडून यावी ! सुग्रीव पहिल्यापासूनच आपले मित्रत्व संपादण्यास इच्छितो, हें वृत्त हनुमानापासून ऐकून त्यांना खरोखर अतिहर्ष झाला. लक्ष्मणानेंहि आपले वृत्त त्यांस कळवून त्यांच्याशीं बोलण्यास सुरुवात केली. हनुमानाचे शुद्ध, व प्रौढ भाषण ऐकून रामचंद्र मुग्ध झाले. त्यानें लक्ष्मणाजवळहि सुग्रीवाची पुष्कळ स्तुति केली.
 वाचक हो, हनुमानाची यथार्थ स्तुति करण्यास येथें अवकाश नाहीं. त्याच्या गुणांचें यथार्थ वर्णन केलं तर त्याचा एक स्वतंत्रच ग्रंथ होईल. त्याच्या गुणांचा परिचय त्याच्या कार्यावरूनच होईल. आम्हांला येथे एवढेच सांगावयाचें आहे कीं, तो अनुपम बली होता.
 या दोघां सुकुमार राजकुमारांना पर्वत चढतांना फार क होतील, असें जेव्हां हनुमानानें पाहिलें, तेव्हां त्यानें त्या दोघांना