च्या धर्मबलानेच तिचे रक्षण केलें. तिच्या धैर्यानेच तिच्या विप- तीच्या महासागरांतून तिला पार केलें.
सीतेला अभिमान तर शिवलाच नव्हता. ती सर्वांशी सम- भावानें वागे. तिनें कधींच कोणाला त्रास दिला नाहीं. आपल्या स्वामिव्यतिरिक्त तिनें कोणाहि पुरुषाकडे वांकड्या दृष्टीने पाहिले नाही. ईश्वराच्या कृपेने तिचे सर्व कुटुंब सदाचारी व धर्मनिष्ठ होतं. एका लक्ष्मणाचेच उदाहरण पहा ना ! वाल्मिकी रामायणांत लिहिले आहे की, लक्ष्मणानें एकवारहि सीतेकडे लक्षपूर्वक पाहिलें नाहीं. फक्त वंदन करतांना तिचे चरण दिसत त्यांकडेच त्याचें लक्ष असे. याला प्रमाण म्हणजे ऋष्यमूक पर्वताच्या कथेचें स्मरण करावें. जेव्हां सीतेच्या दागिन्यांची परीक्षा करण्याकरितां लक्ष्म- णास सांगितले, त्या वेळेस त्याला फक्त पायांतीलच दागिने ओळ- खतां आले. हातांतील कंकर्णे पाहून तो म्हणाला ' हीं मला ओ- ळतां येत नाहींत. ' तात्पर्य हेंच कीं, जशी सीतादेवी शुद्धाचरणी, पवित्र स्वभावाची व पतिव्रता होती, त्याचप्रमाणे तिचे पति, दीर, आणि सर्व संबंधी धर्मात्मे व सदाचारी होते.
पतित्रता स्त्री पतीच्याकडून कितीहि कष्ट झाले तरी आपल्या मनांत कुविचाराला केव्हांहि थारा देत नाहीं. पति वाटेल तें बोलो, परंतु साध्वी स्त्री पतिदेवाची सेवासुश्रुषा आपल्या हातांनी कर- ण्यांत आपल्याला भाग्यवान समजते.
सीतादेवीच्या हृदयांत धर्मरक्षणाची कल्पना आणि कर्तव्य - पालनाचा उत्साह फार प्रवल होता. ज्या वेळेस सीतादेवी गर्भवती होती, त्या वेळेस लोकनिंदेच्या भयाने रामचंद्रांनी तिचा त्याग केला होता. त्या प्रसंगी आपल्या त्यागाविषयीं लक्ष्मणाला ती जें कांहीं बोलली, त्यावरून वाचक व वाचिकांना सीतादेवीच्या महा- नुभवाचें अनुमान करतां येईल. ती गंगेच्या किनाऱ्यावर लक्ष्म-
पान:सीताचरित्र.pdf/१५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४