Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तिसरें कांड.

११७

स्वत:लाहि पार विसरून गेलीं. थोड्या वेळांत ' किंकर्तव्यमूढ' अशी सीतेची स्थिति बदलून गेली. तिला आपल्या कर्तव्यकर्माचेहि ज्ञान राहिलें नाहीं. अशा स्थितीत पतिप्राणास्त्रीचा स्वभाव या- प्रमाणें वदलून जातो, हें यावरून स्पष्ट होत आहे.
 ज्या वेळेस सीतेनें त्याच्यावर वाग्वाणांचा वर्षाव केला, त्या वे- ळेस साधुशील लक्ष्मणाच्या कोमल हृदयावर केवढा आघात झाला असेल, व त्याला त्यापासून किती प्राणांतिक वेदना झाल्या अस- तील, त्याची सहृदय वाचक कल्पना करतील. सीतेच्या कटुवा- क्यांना लक्ष्मणानें तसेंच कटु शब्दांनी उत्तर दिलें नाहीं असें जरी मानले, तरी त्याच्या हृदयाला तिच्या वाग्बाणांनी कमी पीडा झाली असें नाहीं. तो मोठा धार्मिक, साधु, व भ्रातृभक्त होता. तो सीतेला मातेप्रमाणे समजत असे. लक्ष्मण इतका आत्मसंयमी होता कीं, त्यानें सीतेचें तें दुर्भाषण मुकाट्यानें ऐकून घेतलें. अशा साधु- -शील दिराचें मन उगीच दुखविणें हें पाप नाहीं काय ! अशा सच्चरित्र महापुरुषाच्या चारित्र्यावर असा मिथ्या कलंक लावणें हा घोर अन्याय नव्हे का ? आमच्या अल्पमतीला हें मोठें पाप व घोर अन्याय वाटतो. आमच्या समजुतीने तर निर्दोष लक्ष्मणाला दोष लावणे व त्याला दुःशब्दांनीं ताडण करणे चांगलें नाहीं असेंच वाटतें. असो.
 सीतादेवीचें तें दारुण भाषण ऐकून दुःख, क्रोध आणि अभि मान हे सर्व विकार लक्ष्मणाच्या हृदयांत एकदम जागृत झाले; परंतु तो आपले हे सर्व विकार मनांतल्या मनांत दाबून टाकून सीतेला हात जोडून म्हणाला, 'देवी, आपण मला पूजनीय आहांत. मी आपणाला साक्षात् देवीच समजतों. आपल्याला प्रत्युत्तर देणें माझें काम नाहीं. तें मी देऊं शकत नाहीं. अनुचित गोष्टी बोलणें स्त्रियांकडे आहे. त्यांचा स्वभावच असला असतो. आपला यांत