११५
देऊन व चिरवल्कल धारण करून वनांत प्रस्थान केलें, ज्यानें वनांत येतांच रामचंद्राकरितां व सीतादेवीकरितां खाणें पिणें देखील सोडून त्यांची एकनिष्ठपणे सेवा केली, ज्यानें आपल्या आचरणानें संसारांत साधुतेचा आदर्श करून ठेवला, जो आत्मत्यागाकरिता आणि अलौकिक भ्रातृप्रेमाकरितां जगांत प्रसिद्ध झाला, ज्यानें त्या दिवसापासून आमरण केव्हांही सीतादेवीच्या मुखाकडे डोळा वर करून देखील पाहिलें नाहीं, त्या देवतुल्य दीरावर सीतेच्या मुखां- तून असल्या दुर्वाक्यांचा भडिमार व्हावा, ही फार अनर्थाची गोष्ट आहे. सुशील व सदाचारी लक्ष्मणाविषय सीतेची अशी दुर्भावना झालेली पाहून कोणीही कोणत्याही प्रकाराने याबद्दलचा सीतेचा निर्दोषपणा सिद्ध करणार नाहीं. आमचें तर असे स्पष्ट मत आहे की, सीतेनें लक्ष्मणाच्या वर्तनाविषयीं जो संशय प्रकट केला, तो सर्वया मिथ्या व निर्मूल आहे. त्याच्यांत लेशमात्रही तथ्यांश नाहीं. सीता लक्ष्मणाला असली कटु भाषणें बोलेल, आणि त्याच्या सत्शीलाबद्दल शंका दाखवील, असें आम्हांला स्वप्नांत देखील वाटलें नाहीं. सीतेच्या पवित्र व सरळ स्वभावावरून अशी गोष्ट तिच्या हातून घडेल, हें केव्हांच संभवनीय नव्हतें. ही गोष्ट तिच्या नेहमींच्या स्वभावाविरुद्ध तिच्याकडून घडली. तर मग तिच्या तोंडून असले अभद्र शब्द कसें निवाले? सीतादेवी आपणा स्वतःला अशी सहजपणे कशी अगदी विसरून गेली. तिने आपल्या नेहमीच्या स्वभावाविरुद्ध असें वर्तन कां केलें ? आमची परम स्नेहवती, प्रियवादिनी, आणि सतिशिरोरत्न चरित्रनायिका जानकी एखाद्या साधारण स्त्रीयेप्रमाणें कशी झाली ! खचित यांत कांहींतरी गूढ आहे, तेव्हां त्याचा आतां सूक्ष्म रीतीनें विचार केला पाहिजे.
लक्ष्मण एक उत्तम कोटीतील वीरपुरुष होता. त्याच्यांत साहस व तेजस्वीपणा विलक्षण होता. राक्षसांवरोबर झालेल्या युद्धाचा