केले, आपल्या पातिव्रत्य धर्माचें खरें प्रेम दाखविलें, ते कुणाशींहि । लपलेलें नाहीं. एका राजकन्येनें राजस्नुषा होऊन राजकीय विला- सांत्रा लागलेंच त्याग करून आपल्या धर्माचें पालन करण्याकरितां पतिदेवाबरोबर दोन चार दिवसांकरितां नव्हे, तर चौदा वर्षे वनांत जाणें, ही सहज गोष्ट नव्हे !
सीतादेवीने पतीसह वनांत राहूनहि उतम रीतीनें आपल्या कर्तव्याचे पालन केले. सीतादेवी म्हणत असे कीं, पतच्या चरण -कमलांचे दर्शन घडतांच जो आनंद वाटतो तो अनिर्वचनीय आहे. पतीसह वनांत असतांना, ती वनालाच अयोध्येपेक्षा जास्त समजत अमे. जेव्हां रामचंद्रांनी वनांतील दुःखांचे वर्णन करून तिला सांगि- तलें, तेव्हां तिने जें कांहीं उत्तर दिलें, तें भारत वर्षांतील ललनांनी सदोदित लक्षांत ठेवण्यासारखे आहे. ती म्हणाली, 'हे नाथ, आपल्याशि वाय अयोध्या मला नरकतुल्य आहे; आणि आपल्या बरोबर वनांतहि राहणें स्वर्गाप्रमाणे आहे.' तिचे मत होतें कीं, स्त्रियांना पतीशिवाय दुसरें आराध्य दैवतच नाहीं. पतिच स्त्रियांना पूज्य देव, तेच व्रत, तोच नियम आणि तेच तीर्थ आहे. तिची ही निश्चयपूर्वक खात्री होती कीं, जी स्त्री पतिदेवाचा अनादार करून नांवाला कल्पित देवाचे पूजन करते, व सचेतन तीर्थ अशा आपल्या पतीला सोडून जड तीर्थाच्या लोभांत पडते, ती घोर पापाची भागिनी होते. पति- व्रता स्त्रिया आपल्या पतीलाच सर्वस्व मानतात.
रावणाच्या तडाक्यांत सांपडूनहि सीतादेवीने आपल्या धर्माचे - रक्षण करून आपल्या आत्मिक बलाचा फारच चांगल्या तऱ्हेने परिचय करून दिला. रावणाने सीतादेवीला अनेक प्रकारचें प्रलो- न दाखविलें, अनेक प्रकारची लालूच दाखविली, व धाकही दाख- विला; परंतु ती आपल्या धैर्यापासून तिळमात्रहि विचलित झाली नाहीं. " धर्मो रक्षति रक्षितः " या अनुसाराप्रमाणे शेवटीं सीते-
पान:सीताचरित्र.pdf/१४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३