१०५
लाटांप्रमाणे ती राक्षससेना रामचंद्रावर एकदम तुटून पडली. महा- वीर रामचंद्रहि हातांत धनुष्यबाण घेऊन एकटेच निर्भयपणे त्यां- च्यांशी युद्ध करूं लागले. त्यांचें अपूर्व युद्धकौशल्य, असीम सा- इस, व थोर पराक्रम पाहून सर्व राक्षस भयभीत झाले. एकट्या रामचंद्रांनी त्यांच्याशी मोठ्या धैर्यानें, व शौर्यानें युद्ध केलें. जेव्हां हजारों राक्षस रामचंद्राच्या तीक्ष्ण बाणांनी ठार होऊन रणभूमीवर पडले, तेव्हां खर दूषणादि राक्षस त्यांच्यावर वाणांचा सारखा चर्षाव करूं लागले. त्यांनीहि आपल्याकडून शौर्याने लढण्यांत कसर केली नाहीं. परंतु शत्रूंचे हनन करणाऱ्या रामचंद्राचा ते पराभव करूं शकले नाहींत. याप्रमाणे वराच वेळपर्यंत तुंबळ युद्ध होऊन खर, दूषण, वगैरे राक्षस रामाच्या तीक्ष्ण वाणांनी ठार होऊन जमिनीवर पडले. रामचंद्र विजयी झाले. युद्ध संपल्यावर लक्ष्मण सीतेला घेऊन परत आला. या युद्धांत रामचंद्राचा विजय झालेला पाहून सीतेच्या आनंदास पारावार राहिला नाहीं.
लक्ष्मणानें शूर्पनखेचे नाक कान अशा अशुभ वेळी कापले होते की, तिनें जे राक्षस आपल्या सहाय्याकरितां बोलाविले होते, ते सर्व रामचंद्राच्या प्रतापानलांत पतंगाप्रमाणे जळून भस्म झाले. जेव्हां त्या राक्षसीनें आपले बंधु खर, व दूषण रामचंद्राच्या तीक्ष्ण वाणांनीं मरून पडलेले पाहिले, तेव्हां ती रडतच लंकेंत रावणाकडे निघून गेली. तेथे गेल्यावर मोठ्यानें आक्रोश करून तिनें आपलें दुःख रावणाला सांगितले. आपल्या भगिनांचे नाक कान कापलेले पाहून आणि आपल्या महावली वीर खर दूषणांचा वध झालेला ऐकून रावणाला अत्यंत क्रोध आला. रागाने त्याचे ओंठ कार्पू लागले, डोळे लाल झाले, व त्वेपानें तो दांत ओंठ चावू लागला. शूर्पनखा त्याला म्हणाली ' त्याच्याजवळ एक नारीरत्नहि आहे. तिच्या लावण्याची सर देवांगनानांहि येणार नाहीं. तिचें रूप असें