१०३
असत, तेव्हां त्यांच्या भाषणांतील बराच भाग लक्ष्मणासंबंधाचा असे. सीतेनें आपल्या करमणुकीकरितां आपल्या पर्णकुटीजवळ वरीच झाडे व वेली लाविल्या होत्या. सकाळ, संध्याकाळ, ती त्यांना आपल्या हातानेच पाणी घाली.
वाचक हो ! सीता, रामचंद्र, व लक्ष्मण हीं तिघें नेहमी आपला काळ अशाच तऱ्हेच्या मनोरंजनांत चालवीत असत, असे आपण समजू नका. पूजेच्यावेळी पूजा, फिरण्याच्यावेळीं फिरणें, जे कोणी मुनि, ऋषि, त्यांच्या भेटीला येत, त्यांना भेटणें, व चर्चा करणें वगैरे सर्व कामे ती नियमित वेळी करीत. सारांश, ते आपला वेळ क्षण- भरहि व्यर्थ दवडीत नसत.
याप्रमाणे पंचवटीत ते सर्व सुखानें रहात होते. परंतु तें त्यांचें सुख फार दिवस टिकलें नाहीं. कांहीं दिवसानंतर त्यांना एका आपत्तीला तोंड देण्याची पाळी आली. एके दिवशी हे त्रिवर्ग आपल्या पर्णकुटीत आनंदाने बसले असतां एक राक्षसी फिरत फिरत तेथें आली. तेथें आल्यावर ती लक्ष्मणाचें रूप पाहून अत्यंत मोहित झाली. नंतर तिची दृष्टि जेव्हां रामावर गेली तेव्हां तर ती आपलें देहभानच विसरली. दोघां बंधूंचें तें रूप लावण्य पाहून त्या राक्षसीच्या मनांत तत्क्षणी पाप उप्तन्न झालें. लगेच दोघांपैकी कोणाचा तरी एक पति निवडावा असें तिच्या मनानें घेतलें. तिची दुष्ट भावना जाणून उभयतांनी तिला बरेंच धमकाविलें, व तिची निर्भत्सनाहि केली. त्यांच्या तिरस्कारपूर्ण भाषणानें तिला राग आला; ती संतापाने त्यांना म्हणाली 'ज्या स्त्रीमुळे तुम्हीं इतके गर्विष्ठ झाला आहांत, त्याच स्त्रीला मी आतांच खाऊन टाकतें. ही मेल्यावर मग तर तुम्हीं माझ्याशी लग्न लावाल कीं, नाहीं;' असें म्हणून ती एकदम सीतेकडे धांवत गेली. हें पाहतांच दोघे बंधु किंचित् घाबरले, लगेच ते रागाने लाल होऊन, त्यांच्या डोळ्यांतून