९७
पतकरा. एका वेळेस एकच गोष्ट बहूं शकते. दोन घडू शकत नाहींत. मी आपल्याला आग्रह करीत नाहीं; परंतु मला वाटतें कीं आपण मुनिधर्माचा स्वीकार करावा, त्यांच्या व्रताचे पालन करावें. आपण पवित्रात्मा होऊन धर्माचरण करावें. आपण दयाळु आहांत. दयावृत्तीचें पालन करा, धर्माचा विघात करणे आपल्याला योग्य नाहीं. धर्मापासूनच अर्थ; धर्मापासूनच सुख, व धर्मापासूनच सर्वांची उन्नति आहे. ' धर्म एव हतो हून्ती धर्मो रक्षति रक्षितः ' मी आप- ल्यापुढे धर्माविषयीं बोलणें म्हणजे सूर्याला दिवा दाखविण्याप्रमाणें आहे. आपण स्वतःच धर्माचें मर्म चांगल्या तऱ्हेने जाणत आहांत. मी जें कांहीं बोलत आहे, तें स्त्री जातीच्या स्वाभाविक गुणाचें एक दर्शक समजावें. आपणाला कोणीच उपदेश करूं शकत नाहीं. यावेळेस आपण लक्ष्मणासह विचार करून धर्माला अनुसरून उचित असेल तें करा."
रामचंद्र मोठे विद्वान्, मोठे धैर्यवान् आणि विचारशील होते. ते आपल्या पतिप्रिया प्रियतमेचें भाषण ऐकून प्रसन्न झाले. त्यांनी तिला सांगितलें कीं, ' प्रिये, राक्षसांनी फार त्रासवून सोडल्यामुळे बरेच ऋषि, मुनि माझ्याजवळ येऊन ' आमचें रक्षण करा' असें विनवू लागले; तेव्हां 'राक्षसांना मारून मी तुमचें व तुमच्या धर्माचें रक्षण करीन' असें मी त्यांना वचन दिलें. ' आर्त लोकांचें रक्षण करणें हें क्षत्रियाचें मुख्य कर्तव्य आहे. नरमांस भक्षक राक्ष- सांना मारून हैं वन निष्कंटक करणें, हें माझें प्रधानं कर्तव्य आहे. एवढ्याच करितां ऋषींचें रक्षण करण्याचा भार मी आपल्यावर घेतला आहे. आमच्या क्षात्र धर्माला अनुसरूनच मी अशी प्रतिज्ञा केली. देवी, मला सत्य फार प्रिय आहे. सत्यासारखी पवित्र वस्तु संसारांत मला दुसरी कोणतीच प्रिय नाहीं. प्रतिज्ञा करून मी