प्रतकाल झाल्यावर आपल्या बंधु व स्त्रीसह रामचंद्र अत्रे ऋषिजवळ निरोप मागण्यास गेले. त्यांचा निरोप घेऊन ते भयंकर दंडक वनांत जाऊन पोहचले, तें वन सघन वृक्षांनी व त्यापेक्षाही निवड अंधकाराने भरलेलें होतें. पशु, पक्षी तेथें नेहमीं किलबिल करीत होते. कोठें सिंह, वाघ, अस्वले, इत्यादि हिंस्र पला हिंडत होते, तर कोठें महाभयंकर राक्षसांची झुंड प्राणिमात्राला भीति दाखवीत स्वच्छंदाने भ्रमण करीत होती. तर कोठें कोठें तपोधन ऋपीचे पवित्र आश्रम वनाची शोभा वाढवीत होते. त्रिवर्गांनी त्या वनाची शोभा पाहून आपले नेत्र व मन सफल केलें. ते ज्या ज्या वनवासी तपस्व्यांच्या आश्रमांत गेले, त्यांनी त्यांनी त्यांचा मनापा- सून सत्कार केला.
सीतादेवी आतांपर्यंत वनाची शोभा पाहून मोहित झाली होती. तरी रोजच्या रोज दुसरें नवें वन पाहण्याची लालसा तिच्या मनांत अधिक वृद्धिंगत होत होती. वनांत आनंदीआनंद आहे. दुःखाचें नांव नाहीं, अशीच तिची आतांपर्यंत पूर्ण खात्री होती. वनवासांत केव्हां केव्हां भयंकर आपत्तिहि येत असते, अशी कल्पना तिच्या स्वप्नांत देखील आली नाहीं. पण एके दिवशीं तिला वाटलें कीं वनांत नेहमी आनंदच मिळत नाहीं; तर केव्हां केव्हां मोठी आप- तिही भोगण्याचा प्रसंग येतो.
एके दिवशी प्रातःकाळी सीता लक्ष्मणासह रामचंद्र एका तप- स्व्यावरोवर बोलत चालले होते. ते जरा पुढे गेले असतील इतक्यांत एक भयंकर राक्षस त्यांच्या समोरून येतांना दृष्टीस पडला. त्याचें नांव विराध होतें. जवळ येतांच दोषां बंधुसमोर सीतेला उचलून त्याने खांद्यांवर घेतलीं, आणि आपला मार्ग धरला. सीतेची ही दुर्दशा पाहून रामचंद्राला फार दुःख झाले. त्या वेळेस दोषां बंधूनी मोठ्या रागाने व कठोरपणाने त्याच्यावर वाणांचा वर्षाव केला...
पान:सीताचरित्र.pdf/११८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
सीताचरित्र.