सीताचरित्र.
नंतर सीता देवीला व लक्ष्मणाला बरोबर घेऊन रामचंद्र चित्र- कूटाहून निघाले ते अत्रिऋषींच्या आश्रमास येऊन पोहचले. अत्रि- ऋषि मोठे महात्मा व वृद्ध होते. त्यांच्या स्त्रीचें नांव अनसूया होतें. ती महान पंतित्रता व धर्मपरायण स्त्री होती. ती नेहमी पती- जवळ राहून त्याची सेवा, सुश्रूषा करीत होती. ती मोठी विदुषी होती. धर्मशास्त्राचे मर्म ती उत्तम रीतीनें 'जाणत होती. ती पतीसह यमनियमांचें साधन करून ईश्वरभजन करीत असे. महार्ष अत्रीच्या मनांत आपल्या पत्नीसंबंधानें अत्यंत आदर असून तीं दोघें मोठया प्रेमाने रहात असत.
अत्रीऋषीच्या आश्रमांत पोहचतांच रामचंद्रास समोरेच अनसूया दिसली. अनसूया वृद्ध होती, त्यामुळे तिचे केंस शुभ्र झाले होते. ती महान तपःस्विनी होती. रामाच्या आज्ञेवरून सीता तिच्या ज... वळ गेली. सीतेनें तिला आपले नांव सांगून नमस्कार केला. अनसू- येनें तिला आशीर्वाद देऊन कुशल समाचार विचारिला. तिचें कुशल विचारल्यावर ती सीतेला उपदेश करूं लागली. ती म्हणाली :
"
त्यक्त्वा ज्ञातिजनं सीते मानवृद्धिच मानिनि ।
अवरुद्धं वने रामं दिष्ट्या त्वमनुगच्छसि ॥
नगरस्थो वनस्थो वा शुभो वा यदि वाशुभः ।
यासां स्त्रीणां प्रियो भर्ता तासां लोका महोदयाः ॥
दुःशीलः कामवृत्तो वा धनैर्वा परिवर्जितः ।
स्त्रीणामार्यस्वभावानां परमं दैवतं पतिः ॥
त्वाद्वैवस्तु गुणैर्युक्ता दृष्ट लोक परावराः ।
स्त्रियः स्वर्गे चरिष्यन्ति यथा पुण्यकृतस्तथा ॥
तदेव त्वमनुत्रता सती, पतिप्रधाना समयानुवर्तिनी ।
भव स्वभर्तुः सहधर्मचारिणी, यशश्च, धर्मश्च ततः समाप्यसि।। "
( वा. रा. कां. २ सर्ग ११७ ).