Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तिसरें कांड

८५

यी राहण्यांत कोणत्याच प्रकारचें भय नाहीं, असेंच त्यांना वाटत होतें.
 चित्रकूटावर आल्यापासून सीतेनें रामचंद्राची सेवा मोठ्या श्रद्धेनें व भक्तीने केली. त्यामुळे रामचंद्र फार प्रसन्न झाले. रामचंद्र संतुष्ट झालेले पाहून सीतेच्या हर्षाला सीमा राहिली नाहीं. तिनें . तेथील वनश्री व पवित्रस्थाने फिरून पाहिली; त्यांची शोभा पाहून .तिला आनंद वाटला. भरताच्या सेनेची छावणी तेथे पडून हत्ती, घोडे यांच्या फिरण्याने तेथील तृणाने परिपूर्ण असलेल्या प्रदेशाची शोभा पुष्कळच कमी झाली होती. त्यामुळे तें स्थल सोडून दुसरी- कडे जाण्याचा रामचंदानीं पक्का विचार केला. शिवाय तें वन सोडून जाण्याला त्यांना आणखीहि पण बरीच कारणें होतीं. त्यांच्या माता, आणि बंधु भरत, ही मंडळी त्यांस तेथूनच भेटून परत गेल्यामुळे, तेथें त्यांच्या मनाला उल्हास वाटेनासा झाला star. rohit खादी दुःखदायक गोष्ट घडून येते, ती जागा मग एखाद्याला भयानक व शून्य वाटू लागते. तेथें राहण्याला मन घेत नाहीं. निरुपायाने त्याला ती जागा सोडावी लागते, व असे होणें ही गोष्ट स्वाभाविक आहे. तीच अवस्था यावेळीं रामचंद्राची झाली. ज्या ठिकाणी त्यांनी पित्याचा हृदयविदारक निधनवृत्तांत ऐकिला, व अपार शोक केला, ज्या ठिकाणी भरत, गुरुजन, आणि माता यांच्याबरोबर सजल नयनांनी गोष्टी केल्या, तें स्थान त्यांना -शांतीदायक वाटेल काय ? नाहीं, केव्हांहि वाटणार नाहीं. ते जोप- र्यंत तेथे राहतील, तोपर्यंत त्यांस स्वजनांचे स्मरण वारंवार होणार, आणि तें जोपर्यंत होणार तोपर्यंत त्यांच्या चित्ताला स्वास्थ्य मिळणे शक्य नव्हतें. तेव्हां या स्वजनस्मरणरूप दुःसाध्य रोगाची तें स्थान सोडणे, हीच चिकित्सा होती. यामुळेच त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून ते स्थान सोडण्याचा दृढ संकल्प केला.