टला. अयोध्येत पोहोचतांच जिकडे तिकडे दुःखमय स्थिति पाहून त्यांचे हृदय भीतीनें घडघडू लागले. मार्गात कित्येक वेळा भरताने दूताला विचारले, पण त्याने कांहींच वर्तमान सांगितले. नाहीं. कारण वसिष्ठांनी त्याला कांहीं बोलूं नको म्हणून ताकीद केली होती. अस्तु. ज्या वेळेस व्याकुळ चित्त होऊन भरत आपल्या मातेच्या मंदिरांत जाऊन पोहोंचला, त्या वेळेस सर्वांच्या अगोदर दशरथ व रामचंद्र यांचा कुशल समाचार त्यानें कैकयीस विचारिला " तिनें त्याला त्याचें उत्तर न देतां आपल्या पित्याचे व इतर मं- डळीचे कुशल विचारले. त्यानंतर तिनें रामविरहामुळे राजाच्या मृ- त्यूचे व रामवनवासाचे समग्र वर्तमान त्यांस सांगितलें. धर्मात्मा भरत है. हृदयविदारक वर्तमान ऐकतांच मूच्छित होऊन जमिनीवर पडला.. पुष्कळ वेळानंतर जेव्हां तो सावध झाला तेव्हां पापिणी कैकयीला दोष देऊं लागला. सर्वं अनर्थाचें मूळ ही मंथरा असे जाणून त्यानें तिला कडक शासन केलें. त्या वेळेस शत्रुघ्नानें तिच्या कुटिलतेचें व कुचा- ळीचें तिला चांगले फळ दिलें. गुरु वसिष्ठ व मंत्री यांनी एकत्र हो- ऊन राजात्रा अंत्य संस्कार करावयास भरतास सांगितलें. त्यांच्या सांगण्याप्रमाणे कसें बसें दुःख आंवरून त्यानें राजाची क्रिया केली. चंदनादि सुगंधित द्रव्यांनी राजा दशरथाचा प्रतापी देह अग्नीत भस्म होऊन पंच महाभूतांना मिळाला. जे राजशरीर कांहीं दिवसां- पूर्वी राजकीय उपभोगाने धन्य म्हणविलें जात असे त्याची आज राख होऊन गेली. भरताने पित्याचें अत्य कर्म केलें खरें पण तो शो- कमग्न असल्यामुळे त्याला दिवसाभोजन व रात्रीं निद्रा हीं माहीत. नव्हती. रात्रंदिवस पित्याचा मृत्यु व रामाचें वनवासास जाणें. या शोकामुळे त्याचें हृदय जळत असे.
राजा दशरथाची अंत्य क्रिया झाल्यावर गुरुवसिष्ठांनी व मंत्र्यांनी त्यास राजतिलक करण्याविषयी पुष्कळ वेळा सांगितले. सचिवांनी
पान:सीताचरित्र.pdf/१०६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०