-प्रमाण पतीबरोबर गुहा, दाट झाडी व झरे पाहून आपले मनोरं- 'जन करी. त्या मनोहर वनाला व पवित्र आश्रमालाच आपले नेहमीच निवासस्थान समजून ती आनंद प्राप्त करून घेऊं लागली.
बरें, आतां आपण रामचंद्र वगैरेना चित्रकुटावर सोडून थोडा- वेळ अयोध्येकडे वळू. रामचंद्राच्या वियोगानें राजा दशरथाची व - त्याच्या राज्याची काय स्थिति आहे ती पहा !
वर आह्मी लिहिलेच आहे की रामचंद्राला गंगा किनाऱ्यावर सोडून त्यांच्या आज्ञेप्रमाणे सुमंत अयोध्येस परत यावयास निघाला. 'ज्यावेळेस तो अयोध्येस पोहचला, त्यावेळेस रामचंद्राचा वनवास पक्का ठरला; म्हणजे अयोध्यावासी लोक त्याला पाहतांच अत्यंत शोकाकुल झाले. त्यावेळेस राजा दशरथाला जेवढे दुःख झाले असेल, तेवढे दुसऱ्या कोणालाहि झाले नसेल. ते तर नेहमी विलाप --- संताप करून करून अगदीं भ्रमिष्ट झाले. विलाप करणाऱ्या राण्यांना त्यांतून मुख्यतः कौसल्येला म्हणाले ' आतां माझा अंतकाळ जवळ आला आहे. माझ्या लाडक्या रामाच्या वियोगानलांत मी फार दिवस जगत नाहीं. ' त्यावेळी राणी कौ- सल्येरुहि कांहीं कमी दुःख नव्हते; परंतु आपल्या प्रबल शोकावे- गाला तसेंच धैर्यानें आंवरून धरून ती राजाची समजूत करूं लागली. तिनें परोपरीने त्याची पुष्कळ समजूत केली. परंतु राजाचे विरहानलदग्ध हृदय कौसल्येच्या शीतल वाक्यांनीहि शांत झाले नाहीं. पुत्र निर्वासनाच्या सहाव्या रात्रीं राजा दशरथाचे प्राणरूपी पक्षी 'राम राम' म्हणत गगनमंडळांत उडून गेले :<>
महाराज दशरथाचे प्राण विसर्जन झाल्याचे कोणालाच कळले नाहीं. कारण ती वेळ मध्यरात्रीची होती. त्यावेळी सर्व राण्या दुःखमग्न झोपेत होत्या. प्रातःकाळ झाला तेव्हां रोजच्या प्रमाणे सूत, मागध, बंदीजन द्वारावर येऊन राजाचें मंगल स्तुति-गान
.
पान:सीताचरित्र.pdf/१०४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
सीताचरित्र.