पान:सिंचननोंदी.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुष्काळी वाऱ्यांवर डोलणारे सत्तेचे हिरवे सागर
बनवतात प्रत्येक कालव्याला एक दारिद्र्यरेषा
आणि कोरडवाहू खेड्यांचे आम्ही पुरातन रहिवासी
फिरतो पाण्याविना उध्वस्त दाहीदिशा
सत्ता मुठीत ठेवणारे साखरेचे हात
'नासवतात आमची काळी आई
पाटापाटोवर करून पाण्याचा काळा बाजार
कुंपणच. येथे शेत खाई
स्वर्गातून गंगा आणणान्या भगीरथा
तुझे कोरडवाहू वंशज आम्ही