पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होऊन आधुनिकतेचा उष:काल सुरू झाला होता. सन १८४८ ते १८५६ मध्ये लॉर्ड डलहौसीने भारतातील पहिली रेल्वे सुरू केली. त्यातून वाहतूक गतिमान होण्यास साहाय्य झाले. सन १८८० च्या आसपास ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन राय प्रभृती संस्कृत विद्यापीठ उभारू पाहात होते, ते फोर्ट विल्यम कॉलेजच्या माध्यमातून येऊ घातलेल्या इंग्रजी शिक्षण पद्धतीला शह द्यायचा म्हणून. (महाराष्ट्रातही राष्ट्रीय शिक्षण चळवळ - टिळक, आगरकर याच विचाराने रुजवू पहात होते.) 'बंगाल गजट'ला उत्तर म्हणून ‘बंगदत' वृत्तपत्र स्थापन झाली. अशा छोट्या छोट्या घटनांतून कलकत्ता, मुंबई, मद्रासमधून शिक्षित मध्यम वर्ग उदयाला येणे हीच खरे तर आधुनिकतेची नांदी होती.

 पुढे मग सामाजिक सुधारणा उदयाला आल्या. प्रार्थना समाजाच्या द्वारे नवविचारांचा प्रसार झाला. दुसरीकडे इंग्रजांवरही भारतीय साहित्य, संस्कृतीचा प्रभाव होऊन ख्रिश्चन मिशनरींनी मोठ्या प्रमाणात भाषांतरे शब्दकोश व्याकरण ग्रंथांची निर्मिती करून भारतीय भाषा विकासांचे नवे पर्व सुरू केले. विल्यम जोन्सनी केलेला कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम्' चा इंग्रजी अनुवाद उदाहरण म्हणून सांगता येईल. भांडारकर, रानडे, तेलंग, मित्रा, प्रभृती भारतीय विद्येचे अभ्यास पूर्वेची विद्या परंपरा जगास समजावित होते. पूर्व आणि पश्चिमेतील ही देवाणघेवाण यातून आशिया-युरोपमध्ये सहअस्तित्वाची भावना उदयाला आली. केवळ भौतिक सुधारणा आणि विकासातून नाही तर शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक बौद्धिक आदानप्रदानातूनही नवे विचार, जीवन पद्धती भारतीय समाजात रूजू लागल्या. त्यातून समाज आधुनिक होत गेला. विवेकानंद, दादाभाई नौरोजी, सर सय्यद अहमद खान प्रभृतींद्वारा आधुनिकतेचे केवळ समर्थन झाले नाही तर अनुकरणही झाल्यामुळे आधुनिकता गतिशील होऊ शकली.


२७. राष्ट्रीय भावनेचा विकास : पहिले पर्व


 विसाव्या शतकाची सुरुवातच मुळी 'स्वराज्य' शब्दाने झाली. सन १९०६ मध्ये कलकत्ता इथे काँग्रेसच्या व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी हा शब्द उच्चारला. लोकमान्य टिळकांच्या 'केसरी' वृत्तपत्रातील स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे' घोषणाने तो भारतभर परवलीचा बनला. तत्पूर्वी १९०५ ला बंगालची फाळणी झाली होती. भारतात स्वातंत्र्य

साहित्य आणि संस्कृती/९५