पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२३. तेजस्वी दीप


 अठरावे, एकोणिसावे शतक भारतीय राजवटीच्या दृष्टीने पराजयाचा कालखंड असला तरी या काळात राजा जयसिंह व राणा रणजितसिंहासारखे कर्तृत्वसंपन्न राजे उदयाला आले होते, हे जर इतिहास विसरेल तर काळ त्याला क्षमा करणार नाही. अकबराइतकेच योगदान असणारे हे रजपूत राजे म्हणजे राजपुतानाचा गौरवशाली इतिहासच. सवाई जयसिंह जयपूरचा राजा होता. तो ज्योर्तिर्विद होता. भारतीय गणितशाळा विकसित करणारा हा पहिला राजा. त्यांना आपल्या सैन्यात चक्क वैज्ञानिक कर्मचारी दल उभारलं होतं हे वाचूनही विश्वास नाही बसत. तो इतिहासकार होता. तसाच नगररचनाकारही राणा रणजीतसिंह जाट होते. त्यांनी शिखांचे राज्य निर्माण केलं. याचं वर्णन एका फ्रेंच इतिहासकारानं (जाक मो) लिहून ठेवले आहे. रणजितसिंह विद्या पारंगत होते. युरोपियनांना प्रश्न विचारून ते निरुत्तर करत असा त्यांचा लौकिक त्या काळात सर्व पसरलेला असेच एक तेजस्वी दीप हैदरअली होत. ते म्हैसूरचे सुलतान होते. वीर, साहसी होते. या काळातील अन्य उल्लेखनीय म्हणजे महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई, यशवंतराव होळकर, नाना फडणवीस इत्यादी.


२४. कंपनी राज्य आणि सत्तावन्नचे स्वातंत्र्ययुद्ध


{gap}}मुघलांच्या पाडावानंतर भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने ब्रिटिश राज्य सत्तेचा उदय झाला. हे अन्यायी राज्य सुमारे दीडशे वर्षे सुरू होते, असे आपण स्थूलपणे म्हणत असलो, तरी प्रत्यक्षात भारतात ब्रिटिशांचे राज्य ३0५ वर्षे होते. कारण तत्कालीन मद्रास राज्यात ते त्या आधी दीडशे वर्षे अस्तित्वात होते. मुक्तिबोधांनी कोणत्या राज्यात ब्रिटिश राज्य किती वर्षे होते त्याचे तपशील दिले आहेत. (पृ. ५५0) त्यातून मुक्तिबोधांची संशोधन वृत्ती सिद्ध होते. त्यानुसार बंगाल, बिहार, ओरिसात ते सुमारे २०० वर्षे तर पंजाबात ९८ वर्षे होते. ब्रिटिश राज्यसत्ता कंपनी मार्फत फैलावली. ईस्ट इंडिया कंपनी व्यापारांच्या बहाण्याने आली तरी साम्राज्य विस्तार हेच तिचे लक्ष्य होते. या व्यापारी आमिषाने ब्रिटिशांनी जमीनदारांना हाताशी धरून स्थानिक व्यवसाय मारले. इंग्लंडचा तयार माल बाजारपेठेत उतरवून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी केली. लूट' इतकी केली की तो शब्द

साहित्य आणि संस्कृती/९३