पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१९. भारतात मुघल साम्राज्याची स्थापना


 सन १५२५ मध्ये इब्राहिम लोदीचा पराभव करून बाबराने मुघल साम्राज्याची सुरुवात केली. त्याच्या मृत्यूनंतर हुमायूँ गादीवर आला. नंतर शेरशहा सुरी शासक झाला. या झाल्या घटना, सांस्कृतिक उलथापालथीत आपणास लक्षात येते की या काळात अनेक छोटी, मोठी राज्ये, संस्थाने होती. ती मुसलमानांची होती तशी हिंदूची (राजपूत) पण होती. प्रारंभी मुघलांना हिंदूशी दोन हात करावे लागले. पण हे मुघल पूर्व मुस्लीम आक्रमकांच्या तुलनेत सभ्य व सुसंस्कृत होते हे आजवरच्या इतिहासकारांनी न नोंदवलेले तपशील मुक्तिबोध देतात म्हणून हा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो. भारत युद्धविद्येत तोफांचा प्रवेश झाला, तो हा काळ, तलवारी गेल्या नि तोफा आल्या ही युद्धक्रांती होती. ती बाबरांनी घडवली. बाबर क्रूर शासक अशी पारंपरिक ओळख पुसणारे तपशील इथे भेटतात. शेरशहा सुरी ‘मुघल रत्न होते, असा उल्लेख मी तर प्रथमच इथे वाचला. सूफी कवी मलिक मोहमद जायसीने एक महाकाव्य हिंदीत लिहिले आहे. 'पद्मावत' त्याचे नाव. तशी ती रत्नसेन, पद्मिनी व अल्लाउद्दीन खिलजीची त्रिकोणात्मक प्रेम कहाणी. तिला आध्यात्मिक बनवत ती जायसींनी लिहिली. तो कवी शेरशहा सुरीचा समकालीन. त्याने शेरशहा सुरीचे वर्णन करताना लिहिले आहे. ‘सेरसाहि देहली सुलतानू, चारिउँ खंड तपै जस भानू।।" (शेरशहा सुरी हा दिल्लीचा सुलतान. त्याची कीर्ती चारी खंडात सूर्यासारखी दिगंत होती.)


२०. महान अकबर


 मुक्तिबोधांनी अकबराची प्रशंसा केली नसती तरच आश्चर्य वाटले असते. अकबर काळ हा मुघल साम्राज्याचा सुवर्णकाळ! त्याच्या ‘दिने इलाही' धर्माने सर्वधर्म समभावाची दिलेली शिकवण भारतासच काय साच्या जगास आजही मार्गदर्शक, प्रेरक आहे. अकबर व राणाप्रताप हे ऐतिहासिक संयुग इथे यथातथ्य भेटते. सोळावे शतक या दोघांचे. हिंदू, जैन, ख्रिश्चन, पारशी, इस्लाम साच्या धर्माचं संमेलन ही या काळाची उपलब्धी व योगदान होय. अकबर राज्यनीती आजही भारताचे परराष्ट्र धोरण म्हणून टिकून आहे, यातच त्याचे अमरत्व!

साहित्य आणि संस्कृती/९१