पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रजा, उच्च-नीच, साक्षार- निरक्षर अशा फळीत समाज विभागलेला. प्रजेच्या मनातला राजाबद्दलचा आदर संपलेला, ‘कोऊ नृप होह, हमहि हा हानि' अशी निरिच्छता, तुच्छता प्रजेच्या मानसी बिंबल्याचा हा काळ। दोन हजार वर्षे अशाच मानसिकतेत गेली. शिल्प संघ प्रबळ झाले. त्यांच्या नियम, नियंत्रणाचे रूपांतर जात व्यवस्थेत झाले. वैश्य गर्भश्रीमंत झाले नि ‘श्रेष्ठी' बनले. स्त्रीस दुय्यम स्थान प्राप्त झाले याच साम्राज्य कालखंडात हुंडा प्रथेच्या प्रारंभाचा हा काळ. अस्पृश्यतेच्या उगमाची हिच गंगोत्री. गुलाम प्रथा याच काळात जन्मली. कर जुलमी बनले. ऐश्वर्य, विलासास प्राधान्य मिळाले. शोषण टोकाचे झाले ते याच युगात. प्रासाद निर्मिती, गुंफांची खुदाई, भव्य मूर्तीचे कोरीव काम, स्तंभ उभारणी, स्तूप निर्माण सारी गुलाम शोषणाची स्मारकेच खरी, तरपण ती कला उत्कर्षाची प्रतीके बनली. ब्राह्मण वृंदांना देवत्व (?) लाभले ते याच काळात. सूत्र ग्रंथ अस्तित्वात आले. त्यांचे सूत्र वाक्य सांगायचे झाले तर शब्द आणि अर्थ, आचार आणि विचार यांच्या विसंगतीचा ही चरमसीमा इतिहासाने पहिली, अनुभवली व सुवर्ण काळाचे दफन झाले. सारे अध:पतन एकाच युगात म्हणजे अरिष्ट नि अनिष्टाचीच परिणती ना?


११. शृंग-सातवाहन काळ


 इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सनाचे तिसरे शतक हा पाचशे वर्षांचा काळ भारतीय इतिहासात एतद्देशीय साम्राज्य विसर्जनाचा जसा कालखंड ठरतो. तसाच तो विदेशी आक्रमकांच्या चढायांचा काळ म्हणूनही ओळखला जातो. या कालखंडात अखिल भारतीय असे साम्राज्य तर निर्माण झाले नाहीच, उलटपक्षी एन्टीओकस, बँक्ट्रियासारख्या ग्रीकांनी भारतावर चढाया केल्या. मिनँडरने मथुरा, साकेत, पाटलीपुत्रवर कब्जा केला. शकांनी पंजाब, काश्मीर, सिंध पादाक्रांत करून जिंकला. कनिष्कांची सत्ता या वेळी पेशावरमध्ये होती. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मगध साम्राज्य खिळखिळे झाले. शुंग वंशाने मगधवर झेंडा रोवला. सातवाहन, शालिवाहन आणि शतकर्णी घराण्याने आपले साम्राज्य बंगालच्या खाडीपासून ते अरब समुद्रापर्यंत आरपार विस्तारले. यवन, कुशाण, पार्थिव, शक वंश भारतीय होण्याचे हे युग. 'रामायण', 'महाभारत' ही महाकाव्ये या काळी रचली गेली. बौद्ध ‘सुश्रुत ग्रंथांनी निर्मितीपण समांतरपणे याच कालखंडात झाली. जैन साहित्याचा

साहित्य आणि संस्कृती/८५