पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९. प्राचीन भारतीय विद्यापीठे


 तक्षशिला, बनारस, नालंदा, विक्रमशिला, वलभी, ओदांतपुरी, जागरल या नावात वैभवशाली विद्या परंपरा प्रतिबिंबित असल्याचा प्रत्यय येतो. भारतीय सांस्कृतिक श्रेष्ठत्वाच्या खुणा इथं आढळतात. प्राचीन भारतात ‘विद्वान सर्वत्र पूज्यते' हा विचार नव्हता, तो होता आचार! शिक्षणाचा अधिकार केवळ उच्चवर्णीयांना होता, हे वाचताना वाईट वाटतं. पण स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता हे वाचून दिलासा मिळतो. शूद्र वर्णासाठी मात्र हा उपेक्षा काळ होता हे न विसरता येणारे शक्य... ठसठस! ज्ञानदान व चरित्र निर्मितीच्या दृष्टीने या काळाने मोठे योगदान दिलं. वेद, दर्शन, तर्क, व्याकरण, शस्त्रविद्या, चिकित्सा, प्रशासन, कला सर्व विद्या शाखांचा सुकाळ या युगात होता. इसवी सन पूर्व ७०० ते ३00 असा चारशे वर्षांचा हा कालखंड. एकट्या तक्षशिलामध्ये ६८ विषय शिकवले जात. नालंदात दहा हजार विद्यार्थी होते. हे वाचून विश्वास नाही बसत. त्रिपिटकाचार्य, हुएनत्सांग, ह्युएनचिंङ्, व्हु ली, सांग, ताओ सिङ्, आर्यवर्मन हे विदेशी शिक्षक नालंदात शिकवत होते. विक्रशिलात तिबेट संस्कृतीवर संशोधन व्हायचे. ओदांतपुरी हे तंत्र विद्यापीठ होतं, तर जागरल औद्योगिक! सर्वांत दु:खकारक गोष्ट होती ती ही की इथे सामान्यांना प्रवेश नव्हता. आज शिक्षण ही धनदांडग्यांची मिरासदारी झाल्याचे आपण सर्व जण अनुभवतो आहोत. मुक्तिबोध या साच्या प्रभावळीत नेमक्या दोषाकडे अंगुलीनिर्देश करत आपली लेखकीय जबाबदारी पूर्ण करतात. व्यक्तिगत जीवनात सामान्यांचे जीवन जगणारे मुक्तिबोध! बिडी पिणे, टपरीवर चहा पिणे, आयुष्यभर भाड्याच्या घरात जीवन कंठणे नि मृत्युकाळात झगडताना खिशात दमडी नसणे असे भणंग जीवन जगणारे, मोलकरणीच्या मुलीशी प्रेमविवाहाचे साहस करणारे मुक्तिबोध ऐरेगैरे नव्हते. होते ते मूल्यनिष्ठ, विचार प्रतिबद्ध, तत्त्वनिष्ठ! म्हणून त्यांना ऊन दिसते तशी सावलीही! हा असतो इतिहास लेखनातील नीरक्षीर विवेक!


१०. मौर्यकालीन सामाजिक, सांस्कृतिक प्रक्रिया


 इतिहासात तर मौर्य काळ निरंकुश राजसत्तेचा काळ म्हणून नोंदला गेल्याचे दिसून येते. समाज संस्था, संघ, जातीय स्वायत्तता होता. राजा-

साहित्य आणि संस्कृती/८४