पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भटक्या माणसाला स्थिर केले. स्थिरतेतून संस्कृती उदयाला आली. कारण स्थिरतेमुळे तो संग्रहशील झाला नि निर्माताही धान्य, घर, वस्त्रे, भांडी, हत्यारे निर्माण करणारा मनुष्य पशुपालक होत त्यानं धातूयुगात पाऊल ठेवले. तांबे हा त्याने शोधलेला पहिला धातू. नंतर तांब्याचा शोध लागला व नंतर लोखंडाचा. हे आज वाचताना विचित्र वाटत असले, तरी ते ऐतिहासिक सत्य आहे असा गमतीदार मानव संस्कृतीचा उगम -वाचताना गंमत पण विचार करताना वाचकाला गंभीर करणारे प्रकरण मुळात वाचणं म्हणजे भूतकाळात रमणे ते मुक्तिबोधांचं कौशल्य!


२. सभ्यतेची पहाट


 नवं अष्मयुग हे मानवी संस्कृतीचे धातूयुग म्हणून ओळखले जाते. या ताम्रपाषाण युगातच सिंधु संस्कृती उदयास आली. इसवी सन पूर्व ३२०० ते १५00 असा सुमारे १७00 वर्षांचा या संस्कृतीचा काळ. या संस्कृतीचा शोध लागला सन १९२१ च्या उत्खननात. सुमारे २००० स्थळी ही संस्कृती आढळली. त्यातील अधिकांश भारतात आहेत तर अल्प पाकिस्तानात. मोहेंजोदडो आणि हडप्पा ही या संस्कृतीची प्रमुख केंद्रे. रावी, यमुना, गंगा नद्याकाठीही संस्कृती वसली होती. शिवाय एक लुप्त झालेली नदी म्हणजे सरस्वती. तिचा मार्गही या उत्खननातून शोधण्यात यश आले अशी विस्मयकारी माहिती मुक्तिबोध पुरवतात. ही संस्कृती राखालदास बॅनर्जी आणि रायबहादुर दयाराम साहनी यांनी शोधून काढली. विशेष म्हणजे त्या काळात नगरे होती हे उत्खननातून सिद्ध झाले. त्यामुळे प्राचीन काळ म्हणजे जंगली जीवन हे समीकरण खोटे ठरणारे हे संशोधन मानवी सभ्यतेच्या उष:कालाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. नंतर रचना, व्यापार, धर्म, कला, कारिगिरी अशा अनेक अंगांनी या संस्कृतीमुळे मानवी विकासावर प्रकाश टाकला गेला. घरे, रस्ते, वाहने, साधने (गाडी, रथ), वस्त्रे, भांडी, प्रशासन व्यवस्था, धर्म, संस्कृती (हत्यारे, दागिने, नाणी इ.) देव, देवता पशू असे अनेक संदर्भ उलगडून दाखवणाच्या संस्कृतीने एक गोष्ट लक्षात आणून दिली की पूर्वीही संस्कृती होती व ती आजच्या संदर्भात ताडून पाहिले तर प्रगतीशील म्हणावी लागेल. या उत्खननात. मानव वंशीय जे अवशेष सापडले त्या आधारे ही द्रविडी संस्कृती होती हेही सिद्ध होते. द्रविड आज जरी भारताच्या दक्षिणेस वसलेले असले, तरी द्रविड भाषा वर्गातील ब्राहुई भाषा आजही बलुचिस्तानात

साहित्य आणि संस्कृती/७८