पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाले. त्यांनी एक पुढचे पाऊल उचलले. रवींद्रनाथ म्हणाले की, भारत मानव महासागर आहे, त्यात कित्येक शतकांच्या पवित्र जलधारांचा संचय आहे. ज्यास आपण संस्कृती म्हणतो ती कित्येक शतकांच्या समन्वय प्रक्रियेचे रूप आहे. त्यात अनेक जाती व धर्म याची तत्त्वे मिसळून त्यास विशाल केले आहे. ही आमची ताकद आहे. महाकवी इकबाल म्हणतात, “कुछ बात है। की हस्ती मिटती नही हमारी' ही कुछ बात' आमची सांस्कृतिक समन्वयाची शक्ती आहे. आपल्या प्राचीन समाजाच्या विकासाचे मर्म आपण समजून घ्यावे म्हणून मी निरनिराळ्या राजवंशांच्या युद्धांच्या विवरणात अडकून न पडता आपला समाज व त्याची संस्कृती यांच्या विकासाचा मार्ग समजावून सांगण्यावर जास्त भर दिला आहे. त्यात राजकीय घडामोडी आल्या आहेत पण त्यात जासत महत्त्व दिलेले नाही. मी त्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय आंदोलनांना व व्यक्तींना महत्त्व दिले आहे. ज्यांनी समाजास पुढे नेले आणि त्याचे स्वरूप बदलते.

 आपण आल्या पंरपराना जर योग्य प्रकारे तरुणांना समजावून सांगू शकलो तर त्यांच्या विचारांचा विकास होईल व ते उदार बनतील.


गजानन माधव मुक्तीबोध (भाषांतर)

 विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील श्रेष्ठ हिंदी कवी, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, इतिहास व संस्कृतीचे भाष्यकार म्हणून प्रख्यात असलेले गजानन माधव मुक्तिबोध. त्यांचे घराणे महाराष्ट्रीय. पण ते शिकले, वाढले मध्यप्रदेशात. घरी मराठी. समाजात हिंदी. वाचन, व्यासंग इंग्रजीचा लेखनाचा क्रम विचाराल तर इंग्रजी, हिंदी नंतर मराठी त्यांचे मराठी साहित्यविषयक एक टिपण माझ्या संग्रही आहे. ते लिहिले मात्र इंग्रजीत. त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्र होण्यापूर्वी मराठी भाषिक विद्याथ्र्यासाठी पाठ्यपुस्तक लिहिलीत, पण ते ती हिंदीत लिहीत, त्याचे मराठी भाषांतर करीत मग ती छापायला जात. ते जिवंत असेपर्यंत त्यांचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नव्हते. पण लेखन म्हणाल तर विपुल प्रकाशित. तत्कालीन - 'वसुधा', ‘हंस’ ‘नया खून' सारख्या मान्यवर नियतकालिकंत त्यांच्या कविता, लेख, कथा प्रकाशित होत. ‘ब्रह्मराक्षस का शिष्य' ही हिंदीतील श्रेष्ठ कथा. “अंधेरे में ही हिंदीतील सर्वाधिक दीर्घ कविता. 'साहित्यिक की डायरी' हा त्या साहित्य प्रकारातला दीपस्तंभ ‘कामायनी : एक पुनर्विचार' बहुचर्चित समीक्षा

साहित्य आणि संस्कृती/७६