पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आधारे वर्गीकृत केले आहे. मानव्य विद्याशाखेस आपण दोन भागात विभागले आहे (१) मानव्य शास्त्र (Humanistic Sciences) ज्यात अर्थशास्त्र, समाजशास्त्र इत्यादींचा अंतर्भाव होतो. (२) मानव्य विद्या (Humanities) यात कला, तत्त्वज्ञान, आध्यात्मिक चिंतन, मोक्षधर्म इ. चा समावेश असतो. मानव्यशास्त्र आणि मानव्य विद्यांमधील सर्व शास्त्रांचे ध्येय संशोधित घटनांची कारणमीमांसा करणेच असते. भौतिक विज्ञानात ही कारणमीमांसा वा चिकित्सा निगममूलक (Hypothetical Deductive) आणि प्रमाणमूलक/ संख्यात्मक (Quantitative) असते तर मानव्य शास्त्रांमध्ये ती गुणात्मक, अनुभूतीजन्य व कलात्मक असते. मानव्यशास्त्र ज्ञान-विज्ञाने विभिन्न प्रकारच्या मानवीय सांस्कृतिक अनुभूर्तीच्या निर्मितीचा अभ्यास व मूल्यांकन करीत असतात. कला, नैतिकता व अध्यात्म इ. क्षेत्रात आत्मिक जीवनसृष्टीची निर्मिती होत असते. नीतिशास्त्र, सौंदर्यशास्त्र, आध्यात्मिक तत्त्वज्ञान (Philosophy of Religion) इ. मध्ये वरील प्रकारे (कला, नैतिकता) विश्लेषण व समीक्षा होत असते. तत्त्वज्ञानाचे आणखी एक अंग असणा-या तर्कशास्त्रत सर्व प्रकारच्या मानवी वैज्ञानिक विचार पद्धतींचा अभ्यास होत असतो.

 भारतीय वेदान्त दर्शनाचे जे तत्त्वचिंतक आहेत त्यांनी प्रतिपादित केलेल्या मूल्यविचार आणि मानवी आत्म्याचे प्राधान्यक्रम (Spritiual Preferances) यांचा अभ्यास अथवा विचार यांचे बौद्ध व तत्सम अध्यात्मवादी चिंतनधारा समर्थनच करताना दिसतात. सांख्य व न्याय दर्शन मात्र याला आपवाद होत. डॉ. मैत्र यांचे हे म्हणणे खरे आहे की, “पश्चिमी परंपरा अस्तित्व केंद्रित आहे तर भारतीय मूल्य केंद्रिता!२६

 प्रसिद्ध अमेरिकन विचारवंत नाप यांनी पूर्व-पश्चिम चिंतनधारांबद्दल वेगळेच मत मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पौर्वात्य चिंतक आपले सर्व लक्ष सर्वथा भिन्न सौंदर्यमूलक अनुभूती (Differentilated Aesthetic Continuum) वर केंद्रित करतात तर पाश्चात्त्य चिंतक भौतिक जगतासंबंधीच्या कल्पनाप्रसूत व्याख्या सूत्रांसंबंधी (Postulational Theories) विचार करतात. त्यातून अनेक निगमांची निर्मिती शक्य असते. ते पुढे म्हणतात की, 'पौर्वात्य चिंतक जगाच्या प्रत्यक्ष अनुभवांवर भर देतात तर पाश्चात्त्य बौद्धिक अनुभूतीवर. २७ हे जगजाहीर आहे की पौर्वात्य आणि पाश्चिमात्यांनी वेगवेगळी शास्त्रे शोधली व विकसित केले. याचा अर्थ असा घ्यायचा का की पौर्वात्य चिंतक निगम-मूलक चिंतन (Hypothetical- Deductive Thinking) स्वीकारत नव्हते, अथवा त्यांची तशी क्षमता वा योग्यता नव्हती? पण असे

साहित्य आणि संस्कृती/५२