पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
विज्ञान आणि तत्त्वज्ञान


 विज्ञान आणि तत्त्वज्ञान ह्या दोन्हीही सांस्कृतिक क्रिया होत. विज्ञानात भौतिक वास्तवाचा विचार होतो. शिवाय विज्ञानात गोचर आणि अगोचर अशा क्रियांबाबतही विचार होत असतो. ज्या दृश्य परिवर्तन घडवून आणतात. विज्ञान त्यांची व्याख्याही करत असते. याच्याबरोबर विरुध्द तत्त्वज्ञान मानवी जीवन सुसंस्कृत करणा-या, महत्त्वपूर्ण अशा मानवी क्रिया, प्रक्रियांचा अभ्यास होय. या क्रियांचे मानवी जीवनास असाधारण महत्त्व असते. सुसंस्कृत, सभ्य असे मानवी जीवन हेच आपले अंतिम लक्ष्य असल्याने आपण जीवनाच्या श्रेष्ठ मूल्यांची निर्मिती करीत असतो. यावरून आपणास असे म्हणता येईल की, तत्त्वज्ञान ही मानवी मूल्यांचा अभ्यास करणारी विद्या शाखा आहे. दुस-या शब्दात सांगायचे झाले तर तत्त्वज्ञान हे मूल्य विज्ञान आहे. विभिन्न सांस्कृतिक क्रियांची प्रामाणिकता व महत्त्वांचे मूल्यांकन करणाच्या प्रमुख कार्य नि मानदंडांचा शोध घेणे हे तत्त्वज्ञानाचे प्रमुख कार्य होय.

 तत्त्वज्ञान विभिन्न प्रकारच्या सांस्कृतिक अनुभवांची व्याख्या आणि विश्लेषणही करते. याचा उद्देश त्या अनुभव व जीवन व्यवहाराचे मूल्यांकन करणे असते. तत्त्वज्ञानाची प्रमुख तीन अंगे असतात (१) तर्कशास्त्र (२) आचारविज्ञान/वर्तनशास्त्र (३) सौंदर्यशास्त्र. परंतु तत्त्वज्ञान त्या पलीकडेही पुरून उरणारे असे व्यापक क्षेत्र होय. मानवी अनुभूतींचे प्रतिपादन करणाच्या तात्त्विक क्रियांचे सर्वोच्च रूप मानल्या गेलेल्या मोक्ष धर्माची (Religion) व्याख्या तत्त्वज्ञानात होत असते. या दृष्टीने पाहिजे तर असे लक्षात येते की तत्त्वज्ञान हे मानवी जीवनानुभूतींच्या गुणात्मक विकास घडवून आणणारे साधन आहे.

 जर्मन विचारक रिकर्ट, विंडेल बँड, डिल्थे, स्पैंगर प्रभृतींनी नैसर्गिक (Natural) आणि सांस्कृतिक (Culture) विद्यांत शास्त्रात फरक केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक विज्ञानांचे लक्ष्य व्याख्या असून सांस्कृतिक शास्त्रांचे ध्येय समजून घेणे अथवा आकलन करणे (Understanding) आहे. पैकी पहिल्या प्रकारची शास्त्रे सर्वसाधारण स्वरूपाचा अभ्यास करतात तर दुस-या प्रकारची शास्त्रे विशेष परिस्थिती व रूपांचा.२५ आपण या प्रकारांमध्ये थोडाबहुत बदल करून त्यांना स्वीकारलेले आहे. आपण मानवीय विद्या आणि भौतिकशास्त्रांना विषय व अभ्यास पद्धतींच्या

साहित्य आणि संस्कृती/५१