पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
ज्ञानातील सर्जनशीलता

 आपण वर हे पाहिले आहे की, मानव्य विद्याशाखातील ज्ञान-विज्ञानाची विधाने वा सिद्धांत परिचित अनुभवांचा विचार नि पुनर्रचना असते. या दोन्ही क्रिया सर्जनात्मक, खच्या मानवी संबंध बोधाचे साधन, ही संभावनांची उपलब्धी होय. ही उपलब्धीही एक प्रकारे सर्जनात्मक क्रियाच होय. परंतु याचा अर्थ असा नाही की बोध क्रियेची सर्जनात्मकता हा केवळ मानव्य विद्येचा एकाधिकार आहे.

 भारतीय तत्त्वज्ञान परंपरेनुसार (ही परंपरा अर्थातच श्रेष्ठ व आदरणीय होय!) ज्ञानाचे प्रमुख दोन मार्ग, स्रोत आहेत. (१) प्रत्यक्ष (२)अनुमान. भारतीय तर्कशास्त्र हे युक्ती अथवा तर्कास प्रमाण मानत नाही. याचाच अर्थ असा की, नवे ज्ञानसाधन वा स्रोत ते स्वीकारत नाही. १६ परंतु पाश्चात्य तत्त्वज्ञांनी अनुमान व तर्क यात फरक केलेला नाही. त्यांच्या लेखी दोन्ही समान होत. काही काळापूर्वी पाश्चात्त्य तत्त्वचिंतकपण प्रत्यक्ष व तर्क अथवा अनुमानास ज्ञानाचे स्रोत मानीत असत. बेकनच्या काळापासून पाश्चात्त्य तर्कशास्त्री निगम अथवा रूपमूलक तर्क (Formal Reasoning) आणि आगम अर्थात तर्कानुमान (Material Reasoning) मध्ये फरक करू लागलेले दिसून येते. भारतीय तर्कशास्त्रही आगमात्मक तर्क पद्धतीस मान्यता देते. उदाहरणाद्वारे सांगायचे तर ‘धूर आहे तर अग्नी असणारच' असा तर्क ही पद्धती मान्य करताना दिसते.

 टीकाकारांनी आगम नि निगम या दोन्ही तर्कपद्धती सदोष मानल्या आहेत. जॉन स्टुअर्टच्या म्हणण्यानुसार निगम पद्धतीत अन्योन्याश्रित असण्याचा दोष आहे. उदाहरणार्थ ‘सॉक्रेटिस मर्त्य आहे'चा तार्किक अर्थ ‘मानव मर्त्य आहे.' असा होतो. पक्षवाक्य हे निष्कर्षावर अवलंबून असते. कारण जर निष्कर्ष वाक्य चुकीचे निघाले तर पक्षवाक्यही चुकीचे ठरू शकते. याप्रमाणेच आगम पद्धतीची (Induction) ही समीक्षा करण्यात आली आहे. या पद्धतीत ‘काही' च्या आधारे ‘सर्व संबंधी विधान केले जाते. याचे औचित्य मात्र सिद्ध करता येणे अवघड. आजच्या काळात वैज्ञानिक तत्त्वज्ञानाच्या (Philosophy of Science) विचारवंतांनी हे स्पष्ट केले आहे की वैज्ञानिक विचार पद्धती ही मूलतः निगमात्मक अथवा स्थापना निगममूलक (Hypothetical Deductive) असते.१७ प्रत्येक काळात वा परिस्थितीत हा प्रश्न निर्माण होत असतोच की निगम पद्धती आपणास असे ज्ञान देऊ शकते का

साहित्य आणि संस्कृती/४६