पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नियंत्रणाधीन काळातही इंद्रिय सेवी होतेच. सर्व काळात असे लोक असतातच. परंतु त्या काळातही परंपरा मोडणारे होते, हे आपणास विसरून चालणार नाही. ते देव-देवतांच्या प्रकोपास घाबरत नसत, हेही तितकेच खरे. परंतु इंद्रिय-सुखांचा उपभोग घेणाच्या जीवनात मानवी वृत्ती उदात्त करण्याची क्षमता नसते हे आपण लक्षात घ्यायला हवे. या विरुद्ध ते जीवन माणसास आकर्षित करत राहते, जे तात्कालिक असते. ते जीवन कल्पनेचे पंख कापून, माणसास खुजे ठेवून त्याच्या आध्यात्मिक विकासास अडथळेच निर्माण करत राहते.

 लेमांटचे म्हणणे होते की, “मनुष्य आणि निसर्गाचे द्वैत व्यर्थ आहे.१३ याविरुद्ध सर्जनात्मक मानवतावाद या द्वैतास आवश्यक मानत आला आहे. माणसाचा जाणीवपूर्वक व्यवहार अपवादानेच एका विशिष्ट दिशेने होत असतो. कर्ता (द्रष्टा) मनुष्य बहुधा अनेक संभाव्य क्षेत्रे गृहीत धरून अग्रेसर असतो. या संभाव्य क्षेत्रांपैकीच मग एक संकल्पशक्ती बनून हस्तक्षेप करते. नंतर ती नवे वास्तव निर्माण करते. त्यामुळे मग माणसाचे जीवन व्यवहार बुद्धिगम्य, दखलपात्र बनत मग भविष्यवाणी योग्य होतात. या दृष्टीने पाहिले तर लक्षात येते की, मनुष्य व्यवहार हे निसर्ग व्यवहाराविरुद्ध अर्थात विरोधी ध्रुवाचे असतात. म्हणून ज्या अभ्यास व शोध पद्धती निसर्ग अध्ययनास उपयोगी ठरतात, त्या मनुष्य अभ्यासास उपयोगी ठरतीलच असे नाही.


(३)

 माणसाला समजून घ्यायचे तर त्याच्यातील सर्जनशीलता मोकळेपणाने स्वीकारली पाहिजे. माणसाला समजून घेण्याची ती पहिली पायरी होय. ही सर्जनशीलताच माणसास निसर्गापासून वेगळी करते. आपण हे मान्य केले नाही तर अनादि अनंतकालापर्यंत आपण केवळ आश्चर्य करत याच गोष्टीचा खल करत राहू की अन्य भौतिक ज्ञान-विज्ञान शाखांतील प्रगतीसारखी प्रगती मानवीय विद्याशाखांमध्ये का होत नाही. या प्रश्नाचे उत्तर सर्जनशीलतेच्या आकलनातच आहे. हा प्रश्न माणसास निसर्गाचाच एक भाग वा अंश मानणा-यांच्या संदर्भात उद्भवतो. मनुष्य सर्जनशील आहे, त्याच्या क्रिया, प्रतिक्रिया परिवर्तनीय असतात हे मान्य करणाच्या संशोधकांना मोठ्या धैर्याने हे स्वीकार करायला हवे की मानवी स्वभाव वा वृत्तीचे वैशिष्ट्यच खरे तर,

साहित्य आणि संस्कृती/४०