पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांचे स्थान साधनात्मक मूल्यांच्या बरोबरीचे असते आणि ते निश्चितपणे सौंदर्य आणि साधनात्मक मूल्यांपेक्षा खालच्या दर्जाचे असते. उपयोगितेशी संबंधित घटक वा धारणांचे भौतिक विज्ञानत मोठे महत्त्व असते, परंतु सौंदर्यमूलक तसेच तर्कशास्त्रीय निर्मितीत मात्र त्यांचे स्थान गौणच. आपल्या उच्चतम रूपांत वैज्ञानिक निर्मिती (Constructions) व सौंदर्यमूलक तसेच तर्कशास्त्रीय आवश्यकतांनी बद्ध असते.

 अलीकडेच कारसिल लेमांट यांनी आपल्या 'मानवतावाद : एक तत्त्वज्ञान ग्रंथात भौतिकवादी मानवतावादाची रूपरेखा स्पष्ट केली आहे. तो म्हणतो की भौतिकवाद मानवतावादाचे एक आवश्यक तत्त्व वा घटक आहे. त्याला हे मान्य आहे की भौतिकवाद मांडणारे पूर्वसुरी तत्त्वज्ञ सर्वश्री प्रोटेगोरस, डेमोक्राइटस, एपीक्यूरस, ल्यूक्रिशस, ला मेतरी, हॅल्वेशियम, होल्वॉश, डिडेरो, मार्क्स, एंगेल्स, जॉन स्टुअर्ट मिल, रसेल, ड्युई इ. मानवतावादाचेच पूर्व अभ्यासक होते. लेमांट प्रतिपादित मानवतावाद हा स्पष्टपणे धर्मविरोधी आहे. त्यांना प्रबोधन काळातील हा आदर्श मान्य आहे की ‘माणसाने आपले व्यक्तिमत्त्व चहुबाजूंनी विकसित केले पाहिजे.' लेमांट या बाबीवर विशेष भर देतो की, माणसास पृथ्वीतलावरील जीवनात रस पाहिजे (इहलोक) तसेच त्याचा उपभोग घेण्याचाही त्याचा प्रयत्न असला पाहिजे.११

 लेमांटचा उत्साह प्रशंसनीय खराच, परंतु त्याने ज्या प्रकारच्या जीवन उपभोगाची शिफारस केली आहे, त्यात एक प्रकारचा हलकेपणा वा हीन भावाचा आभास आहे. लेमांटच्या जीवन तत्त्वज्ञानात फ्रेंच विचारवंत जॉक मारिता वर्णित ‘वीरोचित जीवनकांक्षेस काही स्थान नाही, जिला तो मानव प्रवृत्तीची जन्मगत वा निसर्गदत्त इच्छा, कामना मानतो.१२

 माणूस सभ्यता वा संस्कृती निर्माण करतो इतके पुरेसे नाही. तर त्याने तिचा उपभोगही घ्यायला हवा. हेही पुरेसे नाही की सभ्य समाज जीवनाच्या सर्व सुविधा सर्वांना सुलभ झाल्या. मानव जीवनाची सार्थकता सुविधा पूर्ततेवर अवलंबून नाही. ती मानव जीवनाच्या सार्थकतेचे महत्त्वाचे अंगही नाही. मानव जीवनाची सार्थकता यावर अवलंबून आहे की ज्या बाबींच्याद्वारे तो प्रेरणा ग्रहण करेल, त्या प्रेरणा म्हणजे दैनंदिन गरजा खचितच नाहीत. माणसाने जीवनाची नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करून जगाच्या निरुपयोगी बाबींशी संबद्ध जीवनाच्या मर्यादा, ओलांडायला हव्यात. पारंपरिक बंधने असतानाही मनुष्य इंद्रिय-सुखापलीकडे जातो का ते अधिक महत्त्वाचे. अशा पारंपरिक मर्यादांचे उल्लंघन ही काही मोठी गोष्ट नव्हे. ऐतिहासिक समाजाच्या

साहित्य आणि संस्कृती/३९