Jump to content

पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विशेष महत्त्व नाही. खरे तर असे काही असतच नाही मुळी. याचा दुसरा अर्थ वा निष्कर्ष असा की, समस्त चिंतन हे व्यावहारिक उद्दिष्टासाठी असते. (ग) शिलरचा मानवतावाद यावर विशेष भर देताना दिसतो की ज्ञानाच्या क्षेत्रात कृती-शक्ति (Will) चे विशेष महत्त्व असते. ज्याला आपण तात्त्विक पदार्थ वा वास्तव म्हणतो तीच खरे तर आपली जिज्ञासा शमवत असते. तथाकथित बुद्धी ‘ते हत्यार आहे ज्याच्याद्वारे वा आधारे आपण स्वत:स परिस्थितीनुरूप बनवत असतो. त्याच जोरावर आपण जीवनात विजयीही होत असतो. या मान्यतेचा एक अर्थ असा होतो की, समग्र सत्य ज्ञान उपयोगी असते. उलटपक्षी निरुपयोगी ज्ञान व्यर्थ असते. (घ) कांटनी व्यावहारिक बुद्धीची मुख्यता (Primacy of practical Reason) स्पष्ट केली आहे. ती स्वीकारून शिलर म्हणतो की, श्रेयाची (Good) धारणा मुख्य असते, तर सत्य तसेच वास्तवाची धारणा गौण वा अप्रधान ठरते.

 शिलरच्या या मान्यतेशी की ‘माणसाचे ज्ञान हे उद्दिष्टसापेक्ष असते. ‘सर्जनात्मक मानवतावाद सहमत आहे. परंतु हा मानवतावाद असे मुळीच मानत नाही की माणसाची उद्दिष्टे केवळ उपयोगी आणि व्यावहारिक असतात. मनुष्य जीवन हे बाह्य जगाच्या तुलनेत केवळ अनुकूलीकरण (Adaptation) नाही आणि माणसाचे जीवन अशी अनुकूल स्थिती वा जग निर्माण करून संपत नसते. सफल अनुकूलीकरण तसेच प्रभावपूर्ण अस्तित्वाच्या गरजांपेक्षा माणसाची बुद्धी आणि कल्पना त्याला कला, सृष्टी, विज्ञान, तत्त्वज्ञानात गुंतवता आली तर किती बरे होईल? कारण यामुळेच तर मानवी आत्म्याचा विस्तार व प्रसार शक्य होत असतो. सर्जनात्मक मानवतावादाची एक शिकवण अशी आहे की माणसाच्या जीवनात जे म्हणून व्यक्तिगत उपयोगाचे असेल त्याबद्दल त्याने उदासीन असायला हवे. म्हणून व्यवहारी मानवतावादी जे सांगतात की समस्त ज्ञान हे उद्दिष्टमूलक वा प्रयोजनमूलक असते, ते खरे नाही. सर्जनात्मक मानवतावादाची अशी धारणा आहे की सौंदर्य नि बुद्धीसंबंधी क्रियांपेक्षा नैतिक व्यवहार हा केव्हाही उच्च पातळीचा असतो. जसे की पुढे सांगितले जाईल, नैतिक शब्दाचा एक अर्थ अनिश्चित आहे. याचा अर्थ असा की कृती असेल वा वस्तू किंवा व्यवहार की ज्यात सर्जनशील धार्मिकता अथवा साधुता प्रतिबिंबित राहते, जेव्हा आपण नैतिकतेस दुस-या अर्थाने गृहीत धरतो तेव्हा त्याचा अर्थ होतो सौंदर्य वा बौद्धिक क्रियेपेक्षा उच्च गोष्ट१० परंतु शिलर नैतिकतेची ही श्रेष्ठता मानत नाही. नैतिक श्रेष्ठतेचा एक एक दुसराच अर्थ त्याला अभिप्रेत दिसतो. ज्या उपयोगी वस्तू असतात,

साहित्य आणि संस्कृती/३८