पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 (ग) माणूस सतत आपल्या प्रतिक्रियांच्या सीमा ओलांडत, विस्तारित राहतो. ज्या परिस्थितीबद्दल माणसाच्या या प्रतिक्रिया असतात ती परिस्थितीही निरंतर बदलत, परिवर्तीत होत असते, तिचा विस्तारही नित्य होत असतो. म्हणून तर आपण परिवर्तन अपेक्षित असतो. माणसाचे प्रवास करणे याच जिज्ञासेतून घडते. माणूस आपल्या सहकारी, सहनिवासी जनांशी गप्पा मारतो, उठतो-बसतो, सिनेमा पाहतो, साहित्य वाचतो, अन्य शेकडो कामे करतो.

 (घ) शेवटी असं सांगता येऊ शकेल की माणसाच्या सर्जनशील प्रकाशनाची परिणती त्यच्या प्रतीकबद्ध, कल्पनामूलक निर्मिती होत असते. ही निर्मिती कविता, कथा, विज्ञान, तत्त्वज्ञान, चिंतन अशा विविध स्थापना, सिद्धांत, धारा, योजना, आदर्श इत्यादी रूपाने होणे म्हणजेच सर्जनशीलतेचा विकास व प्रगटीकरण होय.

 सर्जनात्मक मानवतावादास अन्य वादांपेक्षा वेगळे मानणेच योग्य होईल. मानवतावादाची अनेक अतत्त्वज्ञानिक रूपेही आहेत. जसा - स्व. प्रा. इरविंग बॅबिट आणि स्व. पॉल एल्मर मोरचा ‘पांडित्य मूलक मानवतावाद' (Academic Humanism) असा जॉक मारिताचा समन्वयात्मक मानवतावाद' (Integral or Catholic Humanism) यांच्या तुलनेत वाचकांना आमचे विवेचेन कदाचित ज्ञानवर्धक ठरणारही नाही.

 व्यवहारवादाशी (Pragmatism) मिळता-जुळता मानवतावाद ऑक्सफर्डच्या एफ. सी. एस. शिलर यांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभी मांडला होता. शिलरनी प्रोटेगोरसच्या या गृहिताने की, “वस्तूंचा मानदंड मनुष्य असतो. आपल्या मानवतावादाचे प्रतिपादन केले होते. त्यात त्याने ‘मानव' शब्दाच्या जागी ‘मानव जात' शब्द वापरला होता आणि तो शब्द अधिक समर्पक होता.कारण संपूर्ण मानवजातच (एक मुनष्य नव्हे) वस्तुबोधाचे प्रतिमान होऊ शकते. बहुधा हा मानव शब्दाचा वापर नसून खरे तर ती मानवाची पुनव्र्याख्याच होता. अशाच प्रकारे शिलरने मानदंड किंवा माप (Measure) शब्दाचे स्पष्टीकरण करताना म्हटले होते की त्यात मोजमापाचा समावेश व्हायला हवा. ही मागणी विज्ञानाशी सुसंगतच होती. शिवाय ते परिणाम म्हणजे विज्ञान आधार ना? या भाष्याच्या योग्य-अयोग्यतेबद्दल चर्चाच होऊ शकत नाही. शिलरने चर्चिलेल्या मानवतावादात खालील बाबींचा अंतर्भाव आहे.(क) माणसाचे व्यावहारिक जीवन महत्त्वाचे, चिंतन गौण.(ख) विशुद्ध बौद्धिकता अथवा विशुद्ध चिंतनाचे काही

साहित्य आणि संस्कृती/३७