पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करणे आहे. येथील संस्कृतीचे विवेचन दोन मौलिक मान्यतांच्या आधारावर करण्यात आले आहे. या दोन मान्यता ‘सर्जनात्मक मानवतावाद' च्या विश्लेषणात अंतर्भूत आहेत. सर्वप्रथम मी त्याच्या सैद्धांतिक बाजूवर प्रकाश टाकत आहे.

 ‘मानवता' शब्द प्रारंभापासूनच बहुआयामी स्वरूपात वापरला जात आला आहे. या परिस्थितीत फरक पडलेला नाही. त्याचे पुढील अर्थ प्रचलित आहेत धर्मनिरपेक्ष, मध्ययुगीन सरंजामशाहीविरोधी, नास्तिक (Pagan), इहवादी, बुद्धिवादी, व्यक्तिवादी, तत्त्वज्ञान, अध्यात्म, अभिजात जाणून घेण्यास उत्सुक, मानवी जीवनाच्या अनुभूती नि आस्थांबद्दल प्रेम, आकर्षण असणारा इ. प्रा. एडबर्ड चेने यांनी म्हटल्यानुसार, “सोळाव्या शतकानंतरच्या काळातील ते तत्त्वज्ञान त्याचे केंद्र व लक्ष्य मनुष्यच आहे."६
 प्रा. चेनेंनी मानवतावादाचे जे वर्णन केले आहे ते विस्तृत, स्पष्ट नसले तरी प्रत्येकास स्वीकार्य होईल असे आहे. ग्रीक सोफिस्ट विचारवंत प्रोटेगोरसनी म्हटल्याप्रमाणे, ‘मनुष्यच सर्व गोष्टींची कसोटी आहे. याचेही एक कारण आहे. दोघेही (चेने/प्रोटोगोरस) ‘मनुष्य' शब्दांची व्यवस्थित व्याख्या करत नाहीत. त्यांच्या म्हणण्याचा असा अर्थ होत नाही की ज्ञानवान आणि विवेकी, पुरुष आणि मूर्ख, सामान्य मनुष्य आणि असामान्य (Abnormal) अथवा अवसामान्य (Subnormal) व्यक्ती समानपणे मानवतावादी तत्त्वज्ञानाचे पुरावे होत. म्हणून वाचकांना मला सांगायचे आहे की या ग्रंथात वापरण्यात आलेला ‘सर्जनात्मक मानवतावाद' शब्दाच्या विश्लेषणावर तुम्ही पारंपरिक अर्थ लादू नका. त्याच्या अनुषंगिक (Associations) अर्थाचेही ओझे नको. मी त्यास एका विशिष्ट पारिभाषिक पदावलीच्या रूपात मांडू इच्छितो. मी मांडू इच्छिणारा विचार ‘गुणात्मक मानवतावाद' (Qualitative Humanism) आहे. इंग्लंडच्या क्रेन यांनी आपला ग्रंथ ‘विचार आणि मनुष्य' (Idea and Men) मध्ये विशिष्ट अशा मानवतावादाचे वर्णन केले आहे. त्याला त्यांनी उत्साही, मानवतावादाची (Exuberant Humanism) संज्ञा दिली आहे. परंतु गुणात्मक मानवतावाद त्यापेक्षा भिन्न आहे. कारण यात गुणात्मकतेवर भर आहे असे असून ‘सर्जनात्मक' शब्दाचाच वापर अशासाठी की या शब्दाचा मानवी प्रकृती, वृत्ती, उपलब्धी अशा अनेक अंगांनी जवळचा संबंध आहे.

 सर्जनात्मक मानवतावाद हे मानवकेंद्रित तत्त्वज्ञान आहे. या विचारानुसार मानवाचे सर्वांत श्रेष्ठ गुणवैशिष्ट्य त्याची सर्जनात्मकता आहे. इथे ‘मानव

साहित्य आणि संस्कृती/३२