पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि युरोप खंडातील अनेक तत्त्ववेत्ते व संशोधकांनी ईश्वरीय सत्तेबद्दल शंका व्यक्त केली होती. डार्विनच्या सिध्दांतानुसार महत्त्वाची गोष्ट ही होती की माणसाचा अंतर्भाव प्राणी सृष्टीतच करायला हवा. याचा दुसरा अर्थ असा होता की मानवी जीवनाचे लक्ष्य हे अन्य प्राण्यांपेक्षा वेगळे असूच शकत नाही. काही संवेदनाशील विचारवंतांना, तत्त्ववेत्त्यांना जीवन आणि जगतासंबंधी ही जडवादी धारणा मान्य नाही. याचे प्रमुख कारण असे की जडवादी चिंतन हे माणसाच्या अनंत अर्थपूर्ण उद्दिष्ट आणि ध्येयांच्या तसेच पूर्णत्वाच्या शोधाचा वेध घेऊ शकत नाही. मानवी लालसांचा अर्थबोध ते चिंतन करू शकत नाही. उपनिषदात नमूद केले आहे की, जे अनंत तत्त्व आहे तेच सुखी, जे सान्त वा समीप आहे, त्यात सुख नाही. कोणत्याही प्रश्नांचे समाधान करणाच्या तत्त्वज्ञानास हे सांगता आले पाहिजे की मर्यादित क्षमतेच्या मनुष्यप्राण्यात असीम बुद्धिमत्ता, सृजन-क्षमता कशी? प्राण्यात नि माणसात फरक वा पक्षपात का?

 एकोणिसाव्या शतकातच डर्विनच्या भौतिकवादी निराशाजनक प्रभावावर दोन प्रकारे मात केली. प्रथम काही तत्त्वचिंतकांनी विकासवादी तार्किक पद्धतीचा भौतिकवादाविरोधी प्रतिवाद केला. ज्या जगाने माणसाचा विकास घडवून आणला, ते जग केवळ भौतिक शक्तींची आंधळी कर्मभूमी नव्हती. या दृष्टीने आपण पाहू लागू तर लक्षात येते की विकास- सिद्धांत हिगेलच्या आध्यात्मिक द्वंद्व प्रक्रियेचे (Idealistic Dialectic) खंडन करत नसून उलटपक्षी त्यांची मांडणीच करते. एकोणिसाव्या शतकाच्या अंतिम काळात युरोपातील अध्यात्मवादी चिंतकांनी जडवादी तत्त्वज्ञानाच्या विरोधात एक फळीच उभी केली. या मांडणीतून सूक्ष्म ज्ञानमीमांसावादी तत्त्वज्ञान विकसित झाले. या नव्या तत्त्वज्ञानाचे ध्येयच मुळी जडवादी/ऐहिक तत्त्वज्ञानावर कुठाराघात करणे होते. या पंथातील विचारवंत टॉमस हिल ग्रीन, एफ. एच. बँडले (इंग्लंड), जोशिया राइस (अमेरिका), के. बी. क्रोचे (इटली), विंडेल बँड, रिकार्ट, युकेन (जर्मनी) इ. नी आपल्या विचारांच्या जोरावर हिगेलच्या बुद्धिवादी (Rationalistic) मनोवृत्तीचे, विचारधारेचे पुनरुज्जीवन केले.


विसाव्या शतकाचा उत्क्रांतीवाद, सापेक्षवाद आणि संशयवाद


विसाव्या शतकाचा प्रारंभच मुळी अध्यात्मवादी तत्त्वचिंतकांची बौद्धिक
साहित्य आणि संस्कृती/२७