पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/27

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कसोटी असते जीवनातील विविध ध्येये, उद्दिष्टे यांचे तुलनात्मक मूल्य. जोवर माणसात असा विवेक जागा होणार नाही, तोवर तो अशा विज्ञानानं दिलेल्या साधन आणि सामग्रीचा योग्य उपयोग करू शकणार नाही. आपल्या अस्तित्वाच्या अनेकविध भौतिक-आत्मिक रूपांच्या शोध नि उपयोगानेच माणसात या साधन, सामग्रींच्या कमी-अधिक उपयोगितेची जाणीव निर्माण होत असते. या संदर्भात आपण हे लक्षात घ्यायला हवे की, यंत्रांच्या उपयोगिता वा क्षमता विकासाने माणसाचे जीवन शाश्वत सुखाने समृद्ध होत नसते. खच्या मनुष्य जीवनाच्या समृद्धी व सुखासाठी माणसास विविध भौतिक, सामाजिक, आत्मिक जीवनरूपांच्या विभिन्न गुणात्मक, योग्य अशा मूल्यांची गरज असते. ही मूल्ये विधी-निषेध, विवेकांच्या कसोटीवर उपयोगी-अनुपयोगी, हीन-श्रेष्ठ ठरत असतात. यांच्याच आधरावर मनुष्य तर्कनिष्ठ चिंतन, कला, नीती, अध्यात्म इ. क्षेत्रातील श्रेयस- प्रेयस, होणकसउच्चतराची निवड करत असतो. न्याय करत असतो. तात्त्विक, चिंतनाचे अंतिम उद्दिष्ट हेच असते. म्हणून आजच्या संकटांसंबंधी माणसाच्या जाणीवविषयक असामंजस्य व मर्यादेसंबंधीचे मुख्य आव्हान आहे ते विवेकाचे.

एकोणिसावे शतक

 माणसाच्या बुद्धीस असेच आणखी एक आव्हान एकोणिसाव्या शतकात चार्ल्स डार्विनच्या जीव-जगतविषयक उपपत्ती (Hypothesis) मुळे मिळाले. या उपपत्तीनुसार जीवयोनीसंबंधी एक नवा विचार मांडण्यात आला की जीवांमध्ये अचानक परिवर्तन होते. असे परिवर्तन (Mutotion) फायदेशीर असते. तरी ते अपवाद जीवांत प्रगट होते. सृष्टीतील विविध जीवजंतूंमध्ये जगण्यासाठी आवश्यक अन्न, पाणी, निवारा इ. प्राप्तीसाठी एकमेकांत सतत संघर्ष सुरू असतो. या संघर्षात जे श्रेष्ठ असतात, तेच वाचतात निसर्ग श्रेष्ठत्वाचीच निवड करतो. निसर्गात त्याचे जीवजंतूंचा टिकाव लागतो, ज्यांच्यात उपयुक्त अंग नि कौशल्यांचा विकास होतो. या निवड पद्धतीतून डार्विनने हे सिद्ध केले की जीवजंतूंच्या उपयोगी शरीर रचनेची व्याख्या करण्यासाठी श्रेष्ठ कल्पनेची गरज नसते.

 डार्विनच्या या सिद्धांताने हिगेल प्रवर्तित तत्वज्ञानास छेद दिला गेला. हिगेल असे मानत होता की विश्व वा ब्रह्मांड हे मानवीय रुची, आवड नि उपोयगानुसार घडत असते. डार्विनने आपल्या सिद्धांताने हे स्पष्ट केले की जीवांच्या विशिष्ट शरीर रचनेची व्याख्या करणेसाठी कोण्या सर्वज्ञ स्रष्ट्याची गरज नाही. परंतु ही गोष्ट तितकी महत्त्वाची नव्हती. डार्विनपूर्वीही आशिया

साहित्य आणि संस्कृती/२६