हवा, जेव्हा तिच्या मुळाशी जीवनाच्या असंख्य शक्यता वा मूल्यांप्रतीच अविश्वास व्यक्त केला जात असतो.
वर्तमानकाळात अशाही अन्य बाबी आहेत, ज्या आजच्या संकटांना तीव्र बनवताना दिसतात. निरंतर युद्धभयाच्या उल्लेखाइतकीच महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे आपली व्यस्तता. ती आपल्या सध्याच्या अस्वस्थतेचे व असंतोषाचे खरे कारण होय. आपली यांत्रिक जीवनशैलीही गोंगाट व उतावीळपणाचीच संस्कृती होय. या संस्कृतीची अनेक आकर्षक अपत्ये आहेत. उदाहरणार्थ चित्रपट, रेडिओ इ. या शिवाय माणसाचे विषयसुख चाळवणाच्या अनेक गोष्टी आज आहेत. त्यांचे वाढते प्रस्थ, विशुद्ध व्यावसायिक पातळीवर चालणारा, वाढणारा संपर्क, संवाद या सर्व गोष्टी माणसाचे चिंतन, मनन, सृजन, रोखून धरत आहेत. आजच्या स्त्री-पुरुषांमधील सर्जनशीलता संपली आहे, मग ते कोण्या कारखान्याचे मजूर असोत अथवा कार्यालयाचे लिपिक, कारकून वा शासक वर्ग प्रतिनिधी वा कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक-सर्वांची सर्जनशीलता लुप्त पावली आहे.
आज कारखान्याचा कामगार अथवा सेनेतील सैनिकाची स्थिती या यास्पर्सनी वर्णन केलेल्या यंत्राच्या त्या एका छोट्या भागासारखी झाली आहे. तो ‘यंत्राचा असा भाग असतो की ज्याचे स्वत:चे असे स्वतंत्र अस्तित्व असतंच नाही मुळी. दुसरे असे की त्याची जागा दुसरा तसा भाग केव्हाही घेऊ शकतो. आज माणसाने दोन्ही गोष्टी गमावल्या आहेत. एक आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नि दुसरे आपले जीवन जे तो व्यवच्छेदकपणे वीरोचित अशा स्वरूपात जगू शकत होता. अंतरात्म्यास साक्षी ठेवून, ग्वाही देऊन स्वीकारलेल्या आदर्श शोधापेक्षा कालसापेक्ष सुविधा, विनोद, रंजनामागे तो धावतो आहे. विशेष म्हणजे समाजातील बहुसंख्य लोकांच्या लेखी हेच खरे जीवन ईप्सित बनून गेले आहे.
आजच्या माणसात अस्तित्ववादातील खालील वैशिष्ट्ये दिसून येतात. काळजी आणि भीती, नैराश्य, संकल्पहीनता, एकटेपणा इत्यादी. या स्थितीमागे आपली सामाजिक, राजनैतिक औद्योगिक संस्कृती कारणीभूत आहे, तितकीच माणसाची आध्यात्मिक मूल्यांप्रती अनास्थाही. हीच मूल्ये खरी तर सर्वसमावेशक असतात.
भौतिक आणि सामाजिक परिस्थिती आपणास भौतिक साधने आणि सेवा उपलब्ध करून देत असतात. परंतु माणसास खरी गरज असते ती जीवन विवेकाची; जो त्यास जीवनाचा खरा आनंद, तृप्ती, समाधान देतो. त्याची