Jump to content

पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्कृतीचे तात्त्विक स्वरूप : सर्जनात्मक मानवतावाद


 हिंदी साहित्यात काव्य, कादंबरीच्या बरोबरीने समीक्षा आणि चिंतनाच्या क्षेत्रात मोलाची भर घालणारे तत्त्वचिंतक साहित्यिक म्हणून डॉ. देवराज (१९१७-११९९) ओळखले जातात. ११ काव्यसंग्रह, ९ कादंब-या, ८ समीक्षा ग्रंथांशिवाय त्यांनी १0 वैचारिक ग्रंथ लिहिले ते मूलतः तत्त्वज्ञानी. बनारस हिंदू विद्यापीठात ते उन्नत तत्त्वज्ञान केंद्राचे संचालक होते. तत्पूर्वी लखनौ विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले होते. मार्च, १९९४ मध्ये पुणे विद्यापीठात भारतीय तत्त्वज्ञान परिषद, दिल्लीच्या विद्यमाने डॉ. देवराज यांच्या साहित्य आणि चिंतनावर एक राष्ट्रीय चर्चासत्र योजण्यात आले होते. डॉ. सुरेंद्र बारलिंगे त्यांचे संयोजक होते. चर्चासत्रानंतर त्यातील १२ निवडक शोधनिबंधांचे एक पुस्तक 'देवराज : दर्शन और साहित्य' प्रकाशित करण्यात आले होते. डॉ. सुभाषचंद्र भेलके यांनी ते संपादित केले आहे. डॉ. देवराजांबद्दल हिंदीत डॉ. विश्वंभरनाथ उपाध्याय, डॉ. प्रेमशंकर, डॉ. हरदयाल, डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर, डॉ. राजी सेठ प्रभृती मान्यवरांनी लिहिले आहे. डॉ. देवराजांचे मूळ नाव नंदकिशोर गुप्ता. साहित्य व तत्त्वज्ञानाच्या प्रांतात ते डॉ. एन. के. देवराज, डॉ. देवराज नावाने ओळखले जातात. काव्य, कादंबरी, निबंध, समीक्षा प्रांतात त्याचे विपुल लेखन राहूनही त्यांची ओळख राहिली आहे. ती तत्त्वचिंतक म्हणूनच! त्यांचे ‘साहित्य और संस्कृति' (१९५८) 'संस्कृति का दार्शनिक विवेचन' (१९५७), ‘भारतीय संस्कृति' सारखे ग्रंथ विशेष चर्चिले गेले. पैकी ‘संस्कृति का दर्शनिक विवेचन' ग्रंथ इंग्रजीत भाषांतरित झाला नि जगभर पोहोचला. "Philosophy of Culture" शीर्षक या इंग्रजी भाषांतरामुळे त्यांनी या ग्रंथात चर्चिलेल्या ‘सर्जनात्मक मानवतावाद'लेखाची जगभर चर्चा झाली. कथात्मक लेखन असो वा काव्यात्मक, ते मनोवैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारे तात्त्विक

साहित्य आणि संस्कृती/२१