पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/195

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पारंपरिकतेत छेद देणारे पुरोगामी निकाल, समान नागरिक कायद्याकडे समाजाचा वाढता कल, एक राष्ट्र-एक कर (जीएसटी) हे सारे संकेत राष्ट्रीय एकात्मतेस पूरक ठरणारे आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन भाषा, शिक्षणमाध्यम, सांस्कृतिक एकता, परस्परसामंजस्य, समन्वय व सद्भाववाढीची उदारता यावरच एकात्म भारताचा विचार उभा राहू शकतो, हे लक्षात घेऊन आपण राष्ट्र उभारणीकडे उदार दृष्टीने पहायला हवे.

■ ■

साहित्य आणि संस्कृती/१९४