पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारतीय धर्मसाधनेत कबीराचे स्थान

डॉ. हजारी प्रसाद द्विवेदी


 ज्या काळात कबीराचा जन्म झाला त्यापूर्वी काही वर्षे भारतीय इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे इस्लाम धर्माचे भारतात आगमन. या घटनेचे भारतीय धर्मतत्त्वे आणि समाजव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले. आजवर अपरिवर्तनीय मानल्या गेलेल्या जातिव्यवस्थेवर त्यामुळे जबरदस्त प्रहार झाला. सर्व भारतभर प्रक्षुब्ध वातावरण निर्माण झाले. अनेक पंडित, विचारवंत संभ्रमात पडले. ते आपापल्या परीने भारतीय समाज व धर्मसिद्धांतांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागले.

 सर्वप्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की, मुस्लीम धर्माचे आगमन भारतीय समाजव्यवस्थेच्या संदर्भात अभूतपूर्व का होते? यात वेगळेपण काय होते? भारत हा तसा प्राचीन देश होय. प्राचीन काळापासून इथे मोठमोठ्या साम्राज्यांचा उदय नि अस्त झाला. अनेक संस्कृती इथे निर्माण झाल्या नि भारतभर पसरल्या. तिच्या पाऊलखुणा आजही सर्वत्र दिसून येतात. अशा पार्श्वभूमीवर हे आगमन वीज कोसळण्यासारखे अनपेक्षित होते. इथल्या विजयी विकासावर जणू वज्रपात झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली. अनादि कालापासून इथे विभिन्न जाती, जमाती, संप्रदाय, वंश, भटके, विमुक्तांचे तांडे येत राहिले आहेत. त्यांच्या आगमनाच्या वेळी त्या त्या काळात प्रतिकार, प्रतिक्रिया होत राहिल्या. परंतु सरतेशेवटी ते इथे स्थायिक झाले. इथले रीतीरिवाज, देव-देवता, संस्कृती इ. त्यांनी स्वीकारली. कालौघात ते इथल्या समाजाचे अंग बनले. काही तर सन्मानित म्हणून गणले गेले. भारतीय संस्कृतीचे हे वैशिष्ट्य राहिले आहे की वेळोवेळी बाहेरून आलेल्या प्रत्येक टोळी, तांडे, समूह, जाती इत्यादींच्या अंतर्गत समाज व्यवस्थेत हस्तक्षेप न करता त्यांना सामावून घेण्यात आले. ते पुढे पूर्ण

साहित्य आणि संस्कृती/१७५