पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्कृती : प्रतिकूल परिस्थितीतील आशावाद


 विष्णू प्रभाकर हिंदीतील विख्यात साहित्यिक होत. कथा, कादंबरी, नाटक, एकांकी, आठवणी, व्यक्तिचित्र, आत्मकथा अशा साहित्याच्या सर्व प्रांत नि प्रकारात त्यांच्या लेखणीने मुक्त संचार केल्याचे दिसते. हिंदीत त्यांच्या नावावर दोन डझन साहित्य कृती नोंदवल्या गेल्या आहेत. संख्यात्मक बळ काही खरं साहित्यिक श्रेष्ठत्व नव्हे. वास्तववादी भावुक चित्रण, आदर्श व स्वाभाविकता ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. आवारा मसीहा' ही त्यांची आत्मकथा गाजली. त्यांच्या 'अर्धनारीश्वर' कादंबरीस सन १९९३ चा साहित्य अकादमी पुरस्कार लाभला होता. संस्कृती या विषयावर त्यांनी दोन पुस्तके लिहिलीत. ‘जन, समाज और संस्कृति' (१९८६) आणि दुसरे आहे ‘संस्कृति क्या है?' (२०१५) दोन्ही एकाच विषयावरची पुस्तके दोन्हीचं स्वरूप लेखसंग्रह असंच आहे. दोन्हीतील विषय एकच असल्याने त्यात द्विरुक्ती दोष स्वाभाविकच म्हणावा लागेल. असे असले, तरी विष्णु प्रभाकरांनी या दोन्ही ग्रंथांतून ‘संस्कृतीच्या विविध अंगावर प्रकाश टाकला आहे. त्या विषयाला केंद्र करूनच मी परिचय देत आहे. पैकी ‘जन, समाज और संस्कृति' मध्ये एकूण १७ लेख/निबंध असून संस्कृती, समाज, धर्मनिरपेक्षता, एकात्मता, ‘स्व’ आणि ‘पर संघर्ष (द्वंद्व) या अंगाने विष्णू प्रभाकर या पुस्तकात चर्चा करतात. या दोन्ही पुस्तकात ‘संस्कृती' तत्त्व ते इतिहासाच्या अंगाने न सांगता ते तत्त्वज्ञान विशद करतात. संस्कृति क्या है?' मध्ये दोन भाग आहेत. पहिल्या भागात संस्कृतीचा विष्णू प्रभाकर धर्म, शिक्षण, संस्कार, मन, साहित्य अशा अंगांनी विचार करत, तुलनात्मक रीतीने ते संस्कृती सहअस्तित्व, सत्य, श्रद्धा, ज्ञान, ईश्वर अशा अंगांना स्पर्श करणारा आहे. समग्रतः ही दोन्ही पुस्तके संस्कृती म्हणजे काय? या प्रश्नाचे

साहित्य आणि संस्कृती/१६४