पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तीच गोष्ट दारूची. ती विष का होते हे समजून घ्यायला हवे. मूलतः दारू ही एक ‘स्पिरीट' आहे, हे आपण विसरता नये. नशा ही तिची अंगभूत वृत्ती आहे. ही नशा अल्पकालिक असणे तिचा शाप आहे. जैनेंद्रांनी अत्यंत गांभीर्याने म्हटले आहे की दारूची नशा उतरणारी नसती तर कदाचित मी तिचा स्वीकार केला असता. कारण तीच्यामुळे दुःख, दैन्य सान्यांचंच सरलं असते. कायद्याने दारूबंदी, वेश्याबंदी हे वरवरचे उपाय असतात. प्रश्नांचा निरास म्हणजे कुठासघात. आपण असे सामाजिक प्रश्नांच्या निरासाचा विकासपट मांडत नाही, हे जैनेंद्रांचं शल्य आहे. हे प्रकरण वाचताना जैनेंद्रांनी ग्रंथाचे शीर्षक ‘समय और हम' का ठेवले ते उमगतं. भावुकतेने कोणत्याही सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणे अशक्य. तो भाबडेपणा ठरेल. प्रशासन सुधारणाही अशाच असतात. भावुकतेपेक्षा व्यवहारी सोडवणूक ही सामाजिक प्रश्नांवरचा खरा उतारा होय.

 'समय और हम'च्या 'भारत'खंडात जैनेंद्रांनी ज्या अनेक प्रश्नांची चिंतनात्मक चिकित्सा केली आहे, त्यात प्रादेशिक प्रश्न, सरकारी कर्मचा-यांचा प्रश्न, संरक्षण, गृहनीती, विदेश नीती (परराष्ट्र धोरण), औद्योगिकिकरण, आर्थिक समृद्धी, अशा प्रश्न समस्यांची चर्चा केली आहे. मनुष्य समाजाच्या सांस्कृतिक परीघात हे प्रश्न महत्त्वाचे खरे. पण त्यांची तात्त्विक चर्चा होत राहते. परंतु ती व्यावहारिक अंगानेच. त्यामुळे मूलभूत तत्त्वज्ञानाधारित चर्चा, विचार म्हणून जे प्रश्न उभे ठाकतात त्यांचा विचार तुम्हाला ज्ञानसमाजाकडे घेऊन जातो व प्रगल्भ करतो. तशा अंगाने या ग्रंथात ‘विभेद, विग्रह, अनुशासनहीनता आणि ‘साहित्य-क्षेत्र' या दोन प्रकरणांचा विचार करणे आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे. माहिती अंगाने चर्चेचे ‘शिक्षा, भाषा, अनुसंधान' शीर्षक प्रकरण आहे.

विभेद, विग्रह आणि अनुशासनहीनता

 वर्तमान भारताचे सांस्कृतिक पर्यावरण समजून घ्यायचे असेल तर येथील जात-वास्तव, धर्मस्थिती, वर्गभेद, वर्णभेद त्या अनुषंगाने निर्माण होणारे येथील वर्ग विग्रह मुळातून चिकित्सकपणे पाहायला हवे. स्वातंत्र्यानंतर या सर्व प्रश्नांभोवती घटनात्मक चौकट उभी राहिल्याने मूळ सामाजिक प्रश्नांची वैधानिक हाताळणी नाजूक होऊन गेली आहे. ते प्रश्न स्वातंत्र्यानंतरच्या काळात संवेदनशील तर बनलेच, पण त्यांना अस्तित्व व अस्मितेची किनार लाभली आहे, हे आपणास विसरता येणार नाही. सांप्रदायिकतेचे विष पूर्वी नव्हते तितके विषारी व विखारी बनले आहे. आजच्या राजकारणाने माणसाची

साहित्य आणि संस्कृती/१६०