पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
काम, वेश्या, दारू, तुरुंग आणि प्रशासनिक शैथिल्य

 संस्कृतीचा नि जीवनाचाही एक वामपक्ष असतो. जे हेय असतं, त्याची समाजजीवनात जी चर्चा होते, ती एकतर एकांगी असते नि दुसरी अपेक्षेने माणसाच्या मूलभूत प्रवृत्तींपैकी एक म्हणजे काम (Sex). तिचा सहानुभूतीपूर्वक विचार अपवादानेच होताना दिसतो. मानवी जीवनाच्या मंगल पक्षाचा विचार नेहमी निवृत्ती व मोक्षाच्या अंगाने होत आला आहे. कामभावना क्षीण होते पण तिला निवृत्ती व मोक्ष (समाप्ती/तृप्तता) नसते, हे आपण एकदा खुलेपणाने समजून घ्यायला हवा. जैनेंद्रांनी आपल्या साहित्यात या प्रश्नाची उकल अनेक प्रकारे केली आहे. कामजीवन समाजजीवनाइतकेच खरे तर सहज, पण आपण धर्म, कर्म, सदाचार नैतिकतेच्या नावावर सहजशक्तीवर बंधने आणली. अर्थातच ती कृत्रिम होती. हे नंतरच्या मनुष्य व्यवहाराने स्पष्ट झाले. धर्म व कर्मात आपण भेद केल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे नोंदवत जैनेंद्रांनी काम भावनेस मृत्युंजयी (अजेय) मानले आहे. आपल्याकडे कामभावना नाकारणे अहंकाराचे लक्षण होऊन बसले आहे. पारस्पारिकता हे खरे तर कामजीवनाचे प्रमुख लक्षण. आपण त्यातील प्रेमाकडे कानाडोळा करतो. त्यातून मग वेश्यावृत्तीचे प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न आपण दांभिकतेतून उभे केले आहेत. हा सर्व व्यवसाय भांडवलधारी मनोवृत्तीवर उभा आहे. तो व्यक्तिपूरक आहे. तसाच सामाजिक, वेश्या व्यवसायातील उलाढालीत १० रुपयांपैकी दोन रुपये वेश्येस मिळतात. उर्वरित आठ रुपये व्यवस्थेवर खर्च होतात. इतके मोठे शोषण व विषमता असणारा हा व्यवसाय केवळ स्त्रीपुरुष संबंधांचा नसून एक अर्थव्यवस्था आहे. मनुष्य समाजव्यवहारात कोणतेही भाडोत्री संबंध अशुभच असतात, पण ते अटळ होतात हे पाहायला हवे. केवळ कायद्याने वेश्यावृत्ती नष्ट करता येणार नाही. कारण तिचा संबंध सामाजिक स्वास्थ्याशी निगडित आहे. कृत्रिमता मग ती कोणत्याही प्रकारची असो, ती अस्वास्थ्य निर्माण करणारी असते, हे आपण विचारात घ्यायला हवे. वेश्यावृत्तीचे मूळ स्पष्ट करताना जैनेंद्रांनी लिहिले आहे की, “वेश्यावृत्ति के लिए समस्त वैश्य-वृत्ति को आपको समझना चाहिए। मैं नहीं जानता कि ये दो शब्द यदि ध्वनि में इतने पास है, तो उनका निकास (व्युत्पत्ति) भी क्या एक धातु से है। लेकिन अर्थ-व्यापार के विचार से अलग वेश्या के प्रश्न का विचार पल्लवग्राही ही होगा, मूलग्राही नहीं होगा, यह अच्छी तरह समझ लेना चाहिए।" (पृ. ३४७). या संबंधात आपण हे ही लक्षात घ्यायला हवं की यात न पुरुष राक्षस असतो, न स्त्री कुलटा असते. स्त्री-पुरुष समानाधिकारिता ही या रोगावरचा रामबाण उपाय होय.

साहित्य आणि संस्कृती/१५९