पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जैनेंद्रांचे म्हणणे. "शेक्सपियर में ऐसी विशेषता है कि सदियों से वे सबसे लोकप्रिय लेखकों में से हैं। लेकिन आत्मसाधना की दृष्टि से उन्हें आसानी से अनावश्यक भी मान लिया जा सकता है। टॉलस्टॉय ने उन्हें प्रथम श्रेणी में नहीं रखा है। आध्यात्मिक विचार मजे से उनसे किनारा लेता हुआ चल सकता है। शायद वे अनिवार्य लेखक नहीं है। कुछ वैज्ञानिक जैसे नया आविष्कार, नया प्रकाश का दान दे जाते है, वैसे कुछ लेखक भी मानो विश्व दर्शन के प्रति एक नया आयाम खोल जाते है। शेक्सपिअर को मैं स्वयं उनमें नहीं मान पाता हूँ।" (पृ. २१७). भौतिकी गणित आणि आत्मिक कलेत फरक मानणाच्या जैनेंद्रकुमारांचे हे चिंतन सर्वस्वी त्यांचे आहे. मतभेद मूलतः मान्य करणारे जैनेंद्र श्रेष्ठ विचारवंत अशासाठी की, 'मी म्हणतो तेच खरे असे अहंकारी विवेचन न करता ‘ही पण एक बाजू आहे' समजाविण्यातील त्यांच्या नम्रतेत पारदर्शिता आहे व तर्ककठोरताही! तीच त्यांच्या चिंतनाची खरी सुषमा!

भारत खंड

 ‘समय और हम'चा जो ‘भारत' तिसरा खंड आहे, त्यात भारताचे प्रश्न मांडणारी १४ प्रकरणे आहेत. संमिश्र संस्कृती, जातीय राष्ट्रवाद आणि गांधी, घटना, प्रजासत्ताक व निवडणूक, आमचे पक्ष व नेते, भाषा व प्रश्न, अव्यवस्था आणि गुन्हेगारी, काम, वेश्या, दारू आणि प्रशासन, प्रादेशिक समस्या आणि शासकीय कर्मचा-यांचे प्रश्न अशा शीर्षकाखाली भारतीय संस्कृतीवर म्हणण्यापेक्षा समाजजीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची शीर्षके राजकीय वाटत असली, तरी त्याअंतर्गत करण्यात आलेली चर्चा, चिकित्सा चिंतनाच्या अंगानेच व्यक्त झालेली आहे. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमीवरील समाज चिंतन असं ‘भारत' खंडाचं वर्णन करता येईल.

सांस्कृतिक संमिश्रण

 या प्रकरणात जैनेंद्र भारतविषयक आपले सांस्कृतिक आकलन विशद करतात. इतिहास काळापासून भारताचे मानचित्र (नकाशा) सतत बदलत आले आहे. भारतावर होणारी नित्य आक्रमणं हे त्याचे कारण होय. सततच्या आक्रमणांच्या नंतरही येथील मूळ सांस्कृतिक ढाचा हालला नाही, याचे कारण इथल्या परंपरावादी लोक व्यवहारास द्यावे लागेल. मिश्र संस्कृती भारताच्या प्रारंभापासूनच तिची ओळख राहिली आहे, सर्वसमावेशकता आणि सर्वग्राही वृत्तीमुळे येथील प्रभुसत्ता टिकून आहे, हे जैनेंद्रांचे निरीक्षण

साहित्य आणि संस्कृती/१५४