पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काही महत्त्वाच्या लेखांची भाषांतरे करून प्रकाशित करण्यात आली. हेतू हा की मूळ ग्रंथातील काही भाग थेट वाचकांपर्यंत पोहोचावा व त्यांनी जिज्ञासेने मूळ ग्रंथ वाचावेत. या मालेत पुढील ग्रंथ व त्यातील काही लेखांची प्रामुख्याने चर्चा करण्यात आली-

१. संस्कृति के चार अध्याय - रामधारी सिंह 'दिनकर. (१९५६)

२. भारत : इतिहास और संस्कृति- गजानन माधव मुक्तिबोध (१९८३)

३. बौद्ध संस्कृति - डॉ. राहुल सांस्कृत्यायन (१९५२)

४. जन, समाज और संस्कृति - विष्णु प्रभाकर (१९८६)

५. संस्कृति क्या है? - विष्णु प्रभाकर (२०१५)

६. समय और हम - जैनेंद्रकुमार (१९६२)

७. संस्कृति का दार्शनिक विवेचन - डॉ. देवराज (१९५७)

८. कबीर - डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी (१९४२)

९. अशोक के फूल - डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी (१९४८)

१०. कल्पलता - डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी (१९५१)

११. विचार और वितर्क - डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी (१९५४) १२. कुटज - डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी (१९६४)

 समाज प्रबोधन पत्रिका त्रैमासिकाचा बहुसंख्य वाचक मराठी भाषी व अभ्यासक आहे, हे लक्षात घेऊन ज्या ग्रंथांचा परिचय करून देण्यात आला त्या ग्रंथलेखकाचे साहित्यिक योगदान प्रारंभी देण्यात येऊन मग ग्रंथ परिचय वा भाषांतर देण्यात येत असे. त्यामुळे लेखकाचे श्रेष्ठत्व, वेगळेपणा, विचारधारा, व्यासंग, साहित्य रचना यांची माहिती होत असे. मग वाचक त्या आकलनाधारे पुढील ग्रंथ समजून घ्यायचा. या ग्रंथांविषयी वाचक उत्सुक होऊन त्यांनी तो मिळवून वाचावा असा उद्देश होता. त्यामुळे वाचक समाजात भारतीय संस्कृती ही प्रारंभापासूनच सामायिक संस्कृती आहे. इथे पूर्वापार अनेक जात, धर्म, वंश, संस्कृती, देशातील लोक राहात आल्याने आणि त्यांच्या प्रारंभापासूनच रोटी-बेटी व्यवहार होत आल्याने इथे एक वंश, शुद्ध जात, पवित्र धर्म असे काही नसून सर्व धर्म समभाव, जातीय ऐक्य, सांस्कृतिक देवाणघेवाण चालत आलेली आहे. सामाजिक सहिष्णुता व सांस्कृतिक सामंजस्यावरच या देशाची एकता व अखंडता टिकून आहे. हे परोपरीने अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे संस्कृती म्हणजे नदीकाठची मानव वस्ती व प्राचीन संदर्भ इतकेच नसून ती कालौघात बदलत, विकसित होत जाणारी आहे. हे उपरोक्त ग्रंथ परिचय व लेख भाषांतरातून अधोरेखित