पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/149

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पवनारला आला. जैनेंद्रकुमार, त्यांच्या पत्नी भगवतीबेन व पुत्र प्रदीप सर्वांची या वेळी झालेली मैत्री माझ्या आयुष्याची ठेव होय. शिवाय आचार्य विनोबा, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, राज्यपाल श्रीमन्नारायण असे कितीतरी थोर गांधीवादी मला इथेच भेटले. जैनेंद्रकुमारांनी ‘समय और हम' ला ‘स्वीकृती म्हणून जे दोन शब्द लिहिले आहेत, ते त्यांची जीवनदृष्टी व विचारधारा स्पष्ट करणारे आहे. या समग्र ग्रंथास आस्तिकवादी विचारांची झालर आहे. ती स्पष्ट करताना व विज्ञानाच्या मर्यादा अधोरेखित करत जैनेंद्रकुमारांनी म्हटले आहे की, “माना जाता है कि आस्तिक दर्शन (तत्त्वज्ञान) ही होता है, विज्ञान उससे बरी (मुक्त) है। आज का संकट, जिसमें मानव जाति आ पडी है, बहुत कुछ उसी विच्छेद और विरोध में से बना है। पदार्थविज्ञान (भौतिकशास्त्र) और समाजविज्ञान परस्पर तभी पूरक हो सकेंगे, जब दोनों में एक श्रद्धा और श्वास प्रवाहित होगा। अन्यथा विज्ञान यंत्र-व्यापार को संपन्न करेगा और मानव व्यवहार को विपन्न करता जायेगा।"

 आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सदर ग्रंथास लिहिलेल्या छोटेखानी प्रस्तावनेत ‘समय और हम' ग्रंथाची तुलना लिओ टॉलस्टॉयच्या ‘कन्फेशन और फेथ', जॉर्ज बर्नार्ड शॉच्या ‘बॅक टू मैथ्यूसेला', एच. जी. वेल्सच्या ‘फर्स्ट अँड लास्ट थिंग' आणि सॉमरेट मॉमच्या ‘समिंग अप' शी केली आहे. यावरून ‘समय और हम'चे श्रेष्ठत्व लक्षात येते. त्यांनी म्हटले आहे की, जैनेंद्र के तत्त्वदर्शन की प्रगल्भता, अनेक हृदय का सौहार्द और उनकी वस्तुनिष्ठा और वैज्ञानिकता का प्रत्यय इसमें प्रकट हुआ है। आर्थिक, सामाजिक, राजनैतिक और आध्यात्मिक समस्याओं का मूलगामी विवेचन है। यह जीवन दर्शन है, परंतु जैनेंद्र का अपना भी है।"

पश्चिम खण्ड

 ‘समय और हम' चा दुसरा खंड ‘पश्चिम' असून त्यात स्त्री, राष्ट्रवाद, वर्ग विचार, हिंसात्मक संस्कृती, प्रेम-परिवार, नाणी आणि नीती, अर्थ आणि मूल्य संकट, अर्थ परमार्थीकरण, अर्थ आणि काम, साहित्य आणि कला अशा नऊ उपखंडीय शीर्षकांत प्रश्नोत्तरे सामावली आहेत. या ग्रंथांचे वैशिष्ट्य असे की प्रश्ननिहाय उत्तरांनी उपशीर्षके आहेत. ती अत्यंत समर्पक व सूचक असून वाचक ती नुसती डोळ्यांखाली घालत गेला, तरी त्याला आशयाचे आकलन व्हावे. यापूर्वी सांगितल्यानुसार जैनेंद्रकुमारांनी पश्चिमेतील अनेक देश पाहिलेत. तेथील बुद्धिजीवी, साहित्यिक, राजकारणी यांच्याशी औपचारिक, अनौपचारिक चर्चा, संवाद करण्याची त्यांना संधी लाभली.

साहित्य आणि संस्कृती/१४८