पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मध्य आणि पश्चिम आशियाला सुंदर बनवणारे घुमट नि मिनार भारतीय कलाकारांच्या हस्तस्पर्शानी उजळून निघाले. त्यातले निःसंग कोरडेपण केव्हा निघून गेले ते कळलंसुद्धा नाही. त्यात एकप्रकारचं लालित्य आणि कोमलता आपसूक येऊन गेली, पण मजबुती अटळ राहिली. हिंदू-मुस्लिमांच्या संयुक्त प्रयत्नांनी भवन-निर्माण शैलीत एक नवा अध्याय, शैली विकसित झाली.
 कमानीतून हृदयाची कोमलता डोकावू लागली. बागेत निर्माण केलेल्या हरत-हेच्या झ-या कालव्याच्या खुदाईनंतर रचलेल्या बांधकामातील देवळी, कोनशिलांवर कोरण्यात आलेल्या लता-वेली, फुले-पाने, नक्षी साच्यांतून ओघळणारा आनंद, उल्हास, सौंदर्य, कोमलता, कमनीयता या सा-यांनी एका विशाल कलात्मक संवेदनेला जन्म दिला.

 मध्ययुगाचे हे वैविध्यपूर्ण योगदान अन्य युगांच्या उपलब्धींपेक्षा खचितच आगळे नि सर्वश्रेष्ठ होते.


 • (टीप : गजानन माधव मुक्तिबोध लिखित ‘भारत : इतिहास और संस्कृति' ग्रंथातील भाग १८- ‘मध्ययुगीन संस्कृति अभ्युत्थान तथा मानव सामंजस्य की प्रतिक्रियाएँ' चे भाषांतर)

• मुक्तिबोध रचनावली भाग - ६

भारत : इतिहास और संस्कृति

राजकमल प्रकाशन प्रा. लि.,

नवी दिल्ली- ११०००२

प्रथम आवृत्ती - १९८०

मूल्य रु. ३०/

■ ■

साहित्य आणि संस्कृती/१३४